Jio IPO Updates: जिओच्या आयपीओची प्रतीक्षा संपणार आहे का? या आठवड्यात शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी त्यांच्या घोषणेद्वारे सर्वांना सरप्राईज करू शकतात. याची बरीच चर्चा होत आहे. मुकेश अंबानी २९ ऑगस्ट, शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित करतील. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी टेलिकॉम कंपनी जिओच्या आयपीओबाबत मोठी घोषणा करू शकतात अशी चर्चा आहे.
अंबानींच्या भाषणातून मोठ्या अपेक्षा
इकॉनॉमिक्स टाईम्सच्या वृत्तानुसार, ब्रोकरेज हाऊस बोफा सिक्युरिटीजच्या मते, "या एजीएमद्वारे अनेक मोठ्या धोरणात्मक घोषणा केल्या जातात. अनेक गुंतवणूकदार एजीएममधून आयपीओ टाइमलाइनची घोषणा होण्याची अपेक्षा करत आहेत." या उत्साहामागे मुकेश अंबानी यांचं भाषण आहे. २०१९ च्या एजीएममध्ये मुकेश अंबानी म्हणाले होते की टेलिकॉम आणि रिटेल कंपन्यांचा आयपीओ ५ वर्षांच्या आत आणला जाईल. तथापि, त्यानंतर कोणतीही अपडेट आलेली नाही. रिलायन्सचे विद्यमान शेअरहोल्डर्स देखील जिओच्या आयपीओची टाइमलाइन, मूल्यांकन इत्यादींची आतुरतेनं वाट पाहत आहेत.
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
सध्याच्या बाजारपेठेतील भावना जिओच्या बाजूने आहे. पुढील २ तिमाहीत टेलिकॉम उद्योगात दर वाढू शकतात. जिओनं आधीच अनेक स्वस्त प्रीपेड एन्ट्री प्लॅन बंद केले आहेत.
रिलायन्सच्या शेअर्समध्ये तेजी
आयपीओ व्यतिरिक्त, मुकेश अंबानी यांच्या भाषणात ग्रीन एनर्जीबद्दल काही मोठ्या घोषणा देखील होऊ शकतात. त्याच वेळी, रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांच्या रिटेल विभागाबद्दल काही मोठी माहिती देखील शेअर करू शकतात. आज, सोमवारी, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली आहे. कंपनीचे शेअर्स दुपारी १४१९ रुपयांच्या इंट्रा-डे उच्चांकाच्या जवळ होते. २०२५ मध्ये आतापर्यंत, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सच्या किमती १५ टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)