Lokmat Money > बिझनेस न्यूज > जनरेटिव्ह एआयचे वास्तव! कंपन्यांनी केली अब्जावधींची गुंतवणूक; पण नफा नाहीच! एमआयटीच्या अभ्यासातून धक्कादायक निष्कर्ष

जनरेटिव्ह एआयचे वास्तव! कंपन्यांनी केली अब्जावधींची गुंतवणूक; पण नफा नाहीच! एमआयटीच्या अभ्यासातून धक्कादायक निष्कर्ष

Reality of generative AI: अब्जावधी रुपये खर्च केले तरी चॅटजीपीटी, कोपायलट या जनरेटिव्ह एआय टूल्सचा वापर कंपनीच्या नफ्यावर थेट परिणाम करत नाहीत, असा निष्कर्ष मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एमआयटी) स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या अभ्यासातून समोर आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 09:20 IST2025-08-26T09:20:42+5:302025-08-26T09:20:59+5:30

Reality of generative AI: अब्जावधी रुपये खर्च केले तरी चॅटजीपीटी, कोपायलट या जनरेटिव्ह एआय टूल्सचा वापर कंपनीच्या नफ्यावर थेट परिणाम करत नाहीत, असा निष्कर्ष मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एमआयटी) स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या अभ्यासातून समोर आला आहे.

The reality of generative AI! Companies invested billions; but no profit! Shocking conclusions from MIT study | जनरेटिव्ह एआयचे वास्तव! कंपन्यांनी केली अब्जावधींची गुंतवणूक; पण नफा नाहीच! एमआयटीच्या अभ्यासातून धक्कादायक निष्कर्ष

जनरेटिव्ह एआयचे वास्तव! कंपन्यांनी केली अब्जावधींची गुंतवणूक; पण नफा नाहीच! एमआयटीच्या अभ्यासातून धक्कादायक निष्कर्ष

बोस्टन - अब्जावधी रुपये खर्च केले तरी चॅटजीपीटी, कोपायलट या जनरेटिव्ह एआय टूल्सचा वापर कंपनीच्या नफ्यावर थेट परिणाम करत नाहीत, असा निष्कर्ष मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एमआयटी) स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या अभ्यासातून समोर आला आहे.अभ्यासानुसार, यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता ४० टक्क्यांनी वाढली. मात्र, वाचलेल्या वेळेचा वापर कर्मचारी इतर कामांसाठी करत नसल्याने कंपनीच्या उत्पन्नात वाढ झालेली नाही. 

कंपन्यांना फायदा नाहीच
अभ्यासात सहभागी झालेल्या ९५% कंपन्यांनी कबूल केले की एआय टूल्सचा वापर करूनही त्यांना आर्थिक फायदा झाला नाही. अनेक कंपन्यांनी ग्राहक सेवा, डेटा एंट्री आणि लिखाणासाठी एआय वापरून पाहिले; पण नफा वाढवण्यात अपयश आले.

एआय म्हणजे जादू नव्हे
अभ्यासाचे प्रमुख संशोधक एरिक ब्रायनजॉल्फसन यांच्या मते, “जनरेटिव्ह एआयमध्ये प्रचंड क्षमता आहे; पण त्याचा वापर केवळ कामाचा वेग वाढवण्यासाठी न करता, नफा वाढवण्यासाठी कसा करता येईल, यावर कंपन्यांनी विचार करायला हवा.”

अनुभवी कर्मचाऱ्यांवर फारसा परिणाम नाही : प्रशिक्षित आणि अनुभवी कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर  मात्र जनरेटिव्ह एआयचा फारसा परिणाम झाला नाही. याउलट, नवखे किंवा कमी अनुभवी कर्मचारी एआयच्या मदतीने अधिक चांगले काम करू लागले.

 

Web Title: The reality of generative AI! Companies invested billions; but no profit! Shocking conclusions from MIT study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.