नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कठोर धोरणांमुळे बँकांचे कर्ज वितरण काही प्रमाणात थंडावले असताना डिसेंबर २०२४ मध्ये सोने तारण कर्ज सुमारे ७२ टक्के वाढले. या महिन्यातील बँकांची अखाद्य कर्जवृद्धी मात्र अवघी ११.१ टक्के राहिली. वैयक्तिक आणि असुरक्षित कर्जातही घसरण पाहायला मिळाली.
केअर रेटिंग्जने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२४ मध्ये वैयक्तिक कर्जाच्या वृद्धीत २.५ पट घट झाली आहे. डिसेंबर २०२३ मध्ये २३.२ टक्के असलेला हा वृद्धी दर डिसेंबर २०२४ मध्ये ९.२ टक्क्यांवर आला.
वाहन कर्ज वृद्धीवर परिणाम
डिसेंबर २०२४ मध्ये वाहन कर्जाची वृद्धी घटून ८.८% झाली. आदल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये ती १९.७ टक्के होती. क्रेडिट कार्डद्वारे दिल्या जाणाऱ्या कर्जातही घट झाली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये क्रेडिट कार्ड आउटस्टँडिंग वृद्धी १५.६% राहिली. आदल्या वर्षी ती ३२.६ टक्के होती.