Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > AI मध्ये अव्वल राहण्याची चढाओढ! गुगल, अमेझॉन, मेटा अन् मायक्रोसॉफ्ट खेळणार ६५० अब्ज डॉलर्सचा डाव

AI मध्ये अव्वल राहण्याची चढाओढ! गुगल, अमेझॉन, मेटा अन् मायक्रोसॉफ्ट खेळणार ६५० अब्ज डॉलर्सचा डाव

AI चे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 16:46 IST2026-02-08T16:45:50+5:302026-02-08T16:46:47+5:30

AI चे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे.

The race to be the leader in AI! Google, Amazon, Meta and Microsoft will invest $650 billion | AI मध्ये अव्वल राहण्याची चढाओढ! गुगल, अमेझॉन, मेटा अन् मायक्रोसॉफ्ट खेळणार ६५० अब्ज डॉलर्सचा डाव

AI मध्ये अव्वल राहण्याची चढाओढ! गुगल, अमेझॉन, मेटा अन् मायक्रोसॉफ्ट खेळणार ६५० अब्ज डॉलर्सचा डाव

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात वर्चस्व मिळवण्यासाठी जगातील आघाडीच्या टेक कंपन्या अल्फाबेट (गुगल), अमेझॉन, मेटा आणि मायक्रोसॉफ्ट २०२६ मध्ये एकूण ६५० अब्ज डॉलर्स इतकी प्रचंड गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहेत. हा खर्च प्रामुख्याने डेटा सेंटर्स, AI चिप्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीवर होणार असून, AI टूल्सच्या स्पर्धेत आघाडी राखणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

तज्ज्ञांच्या मते, हा या शतकातील आतापर्यंतचा सर्वात मोठी AI गुंतवणूक ठरणार असून, प्रत्येक कंपनीसाठी गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक कॅपिटल स्पेंडिंगचा विक्रम मोडणारा ठरेल.

कुठे होणार खर्च?

या गुंतवणुकीतून नवीन डेटा सेंटर्स, AI चिप्स, नेटवर्किंग केबल्स, बॅकअप जनरेटर्स, तसेच इतर अत्याधुनिक उपकरणे यांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जाणार आहे. AI बाजार अजून सुरुवातीच्या टप्प्यात असतानाच आघाडी मिळवण्यासाठी कंपन्या ही आक्रमक रणनीती अवलंबत आहेत.

पारंपरिक खर्चात कपात, कॅपिटल प्रोजेक्ट्सवर भर

AI मधून भविष्यात मोठ्या प्रमाणात कमाई होईल, असा विश्वास या कंपन्यांना आहे. त्यामुळे पारंपरिक कार्यालयीन खर्चात कपात करून डेटा सेंटर्स आणि मोठ्या कॅपिटल प्रोजेक्ट्सकडे निधी वळवला जात आहे. चॅटजीपीटीसारख्या टूल्सशी स्पर्धा करण्यासाठी अधिक सक्षम मॉडेल्स तयार करताना हजारो महागड्या चिप्सची आवश्यकता भासते याचमुळे खर्चाचा हा प्रचंड आकडा समोर येतो.

कंपन्यांनुसार गुंतवणुकीचा तपशील

अमेझॉन: सुमारे २०० अब्ज डॉलर्स

अल्फाबेट (गुगल): सुमारे १८५ अब्ज डॉलर्स

मेटा: सुमारे १३५ अब्ज डॉलर्स

मायक्रोसॉफ्ट: सुमारे १०५ अब्ज डॉलर्स

एकत्रित पाहता हा खर्च ६५० अब्ज डॉलर्स इतका होतो, जो मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ६० टक्क्यांनी अधिक आहे. विशेष म्हणजे, मेटाने तब्बल ६ वर्षांनंतर संशोधनापेक्षा प्रॉपर्टी आणि इक्विपमेंटवर अधिक खर्च केल्याची नोंद झाली आहे.

संधी आणि धोके

इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, तज्ज्ञांचे मत आहे की AI कम्प्युटिंग हे पुढील मोठे मार्केट ठरणार आहे आणि जो आधी पुढे जाईल तोच सर्वाधिक फायदा उचलणार.
डी.ए. डेव्हिडसनचे विश्लेषक गिल लुरिया म्हणतात, या चारही कंपन्यांना हरायचे नाही. म्हणूनच त्या रेसमध्ये पूर्ण ताकदीनिशी उतरल्या आहेत. मात्र, काही तज्ज्ञ खर्चाच्या परताव्याबाबत (रिटर्न) चिंता व्यक्त करत आहेत. थिअरी व्हेंचर्सचे गुंतवणूकदार टोमास जंगुज यांच्या मते, या कंपन्या कधी काळी रोख रक्कम निर्माण करणाऱ्या मशीन होत्या; आता त्या कर्ज घेऊन खर्च करत आहेत. हे अर्थव्यवस्थेसाठी मोठे कॅटालिस्ट ठरू शकते, पण अडथळेही निर्माण होऊ शकतात.

शेअर बाजारात परिणाम

AI वरील प्रचंड खर्चामुळे तात्काळ परतावा मिळेल का, याबाबत गुंतवणूकदार साशंक आहेत. याच चिंतेचा परिणाम काही शेअर्सवर दिसून आला असून, अमेझॉनचे शेअर्स घसरले आहेत. बूमीचे सीईओ स्टीव्ह लुकास म्हणतात, AI च्या क्षमतेबाबत शंका नाही; मात्र वेळ आणि अर्थशास्त्र यावर प्रश्नचिन्ह आहे.

भारताच्या दृष्टीने महत्त्व

भारताच्या दृष्टीने हा आकडा अत्यंत मोठा आहे. भारत सरकारचा २०२६-२७ चा एकूण अर्थसंकल्प सुमारे ६७० अब्ज डॉलर्स इतका आहे आणि केवळ चार खासगी कंपन्या AI वर जवळपास एवढाच खर्च करणार आहेत. यातून AI जगाला किती वेगाने बदलत आहे, हे स्पष्ट होते. हा खर्च केवळ टेक सेक्टरपुरता मर्यादित न राहता नोकऱ्या, उद्योग, ऊर्जा आणि एकूण अर्थव्यवस्था यांवरही दूरगामी परिणाम करणार आहे.

Web Title : एआई रेस: टेक दिग्गज 2026 तक 650 बिलियन डॉलर का निवेश करेंगे

Web Summary : गूगल, अमेज़ॅन, मेटा और माइक्रोसॉफ्ट 2026 तक एआई में 650 बिलियन डॉलर का निवेश करेंगे, मुख्य रूप से डेटा केंद्रों और बुनियादी ढांचे पर। इस विशाल निवेश का उद्देश्य एआई उपकरण बाजार पर हावी होना है, जो संभावित रूप से नौकरियों, उद्योगों और वैश्विक अर्थव्यवस्था को नया रूप देगा।

Web Title : AI Race: Tech Giants to Invest $650 Billion by 2026

Web Summary : Google, Amazon, Meta, and Microsoft will invest $650 billion in AI by 2026, primarily on data centers and infrastructure. This massive investment aims to dominate the AI tools market, potentially reshaping jobs, industries, and the global economy, dwarfing national budgets.