Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार

जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार

देशातील ग्राहकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात महागाईचा मोठा झटका घेऊन येण्याची शक्यता आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या मागणीमुळे जगभरात निर्माण झालेली ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 09:58 IST2025-12-15T09:58:09+5:302025-12-15T09:58:53+5:30

देशातील ग्राहकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात महागाईचा मोठा झटका घेऊन येण्याची शक्यता आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या मागणीमुळे जगभरात निर्माण झालेली ...

The joy of GST reduction is over...! 'Inflation shock' in the new year! Prices of TVs, cars, smartphones to increase by 10 percent | जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार

जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार

देशातील ग्राहकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात महागाईचा मोठा झटका घेऊन येण्याची शक्यता आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या मागणीमुळे जगभरात निर्माण झालेली चिप्सची टंचाई आणि डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची झालेली ऐतिहासिक घसरण, या दुहेरी कारणामुळे जानेवारी २०२६ पासून टीव्ही, स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कार यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

कंपन्यांनी दिलेल्या संकेतनुसार, या वस्तूंच्या किंमतीत किमान ४ ते ५ टक्क्यांनी वाढ होईल, तर परिस्थिती अशीच राहिली तर ही दरवाढ १० टक्क्यांपर्यंत जाण्याची भीती व्यक्त होत आहे. एआय चिपच्या किंमती ५०० टक्क्यांनी वाढल्या आहेत.

AI चिप्सची टंचाई: सध्या जागतिक स्तरावर आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी वापरल्या जाणाऱ्या ‘हाय-बँडविड्थ मेमरी’ चिप्सची मागणी प्रचंड वाढली आहे. या मागणीमुळे अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सामान्य मेमरी चिप्सच्या पुरवठ्यात मोठी घट झाली आहे. अहवालानुसार, गेल्या काही महिन्यांत मेमरी चिप्सच्या किंमतीत तब्बल ५०० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. या वाढीव खर्चाचा बोजा कंपन्या थेट ग्राहकांवर टाकणार आहेत.

रुपयाचे ऐतिहासिक अवमूल्यन
भारतीय रुपयाने ९० रुपये प्रति डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. टीव्ही, स्मार्टफोन आणि लॅपटॉपसारख्या वस्तूंसाठी लागणारे ‘ओपन सेल’, सेमीकंडक्टर चिप्स आणि मदरबोर्ड यांसारखे ७० टक्क्यांहून अधिक घटक आयात करावे लागतात. रुपया कमजोर झाल्यामुळे आयातीचा खर्च प्रचंड वाढला आहे, ज्यामुळे उत्पादनाची एकूण किंमत वाढली आहे.

या दरवाढीमुळे, सरकारने अलीकडेच ३२ इंच किंवा त्याहून मोठ्या टीव्ही स्क्रीनवर जीएसटी दर २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आणून ग्राहकांना दिलेली दिलासादायक सवलत आता फिकी पडण्याची शक्यता आहे.

Web Title : महंगाई की लहर: टीवी, कार, स्मार्टफोन की कीमतें 10% तक बढ़ेंगी

Web Summary : जनवरी 2026 से चिप की कमी और रुपये में गिरावट के कारण टीवी, कार और स्मार्टफोन जैसे इलेक्ट्रॉनिक्स की कीमतों में 10% तक की वृद्धि हो सकती है। एआई चिप की कीमतें बढ़ गई हैं, जिससे उत्पादन लागत प्रभावित हो रही है और हाल ही में जीएसटी राहत का असर कम हो रहा है।

Web Title : Inflation wave: TV, car, smartphone prices to rise by 10%

Web Summary : Electronics like TVs, cars and smartphones may see a 10% price increase due to chip shortages and rupee depreciation from January 2026. AI chip prices have surged, impacting overall production costs and negating recent GST relief.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.