Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?

देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?

इलॉन मस्क यांची कंपनी टेस्लाची सायबर ट्रक गुजरातमधील सुरतमध्ये पोहोचली आहे. सुरतमधील प्रसिद्ध हिरे व्यापाऱ्यानं याची ऑर्डर दिल्याची माहिती समोर आलीये.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 15:15 IST2025-04-26T15:11:38+5:302025-04-26T15:15:18+5:30

इलॉन मस्क यांची कंपनी टेस्लाची सायबर ट्रक गुजरातमधील सुरतमध्ये पोहोचली आहे. सुरतमधील प्रसिद्ध हिरे व्यापाऱ्यानं याची ऑर्डर दिल्याची माहिती समोर आलीये.

The country s first Tesla Cybertruck reaches Gujarat big purchase by a diamond merchant from Surat Lavjii Badshah | देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?

देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?

इलॉन मस्क यांची कंपनी टेस्लाची सायबर ट्रक गुजरातमधील सुरतमध्ये पोहोचली आहे. सुरतमधील प्रसिद्ध व्यापारी लवजी बादशाह यांनी याची ऑर्डर दिल्याची माहिती समोर आलीये. भारतात पोहोचलेला हा पहिला सायबर ट्रक आहे. हिरे व्यापारी आणि कारप्रेमी लवजी यांनी त्यावर आपल्या घराचं 'गोपिन' हे नावदेखील लिहिलं आहे.

लवजी बादशाह यांनी दुबई पासिंगचा हा टेस्ला सायबरट्रक मागवला आहे, जो आज मुंबईमार्गे सुरतला पोहोचला आहे. कालपर्यंत टेस्लाचा सायबर ट्रक भारतात पोहोचल्याची चर्चा होती, पण ती कोणी मागवली हे कुणालाच ठाऊक नव्हतं. पण सुरतला पोहोचल्यानंतर ती लवजी बादशाह यांनी मागवल्याचं उघड झालं.

Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?

या कारचं डिझाइन एखाद्या रोबोटिक फिल्म सुपरहिरोसाठी बनवल्याप्रमाणे दिसत आहे. हा सायबर ट्रक ३० पट मजबूत स्टेनलेस स्टीलनं बनवलेला आहे. याचे डिझाईन इतर कार डिझाइनपेक्षा वेगळं आहे. या सायबर ट्रकमध्ये खास बुलेटप्रूफ ग्लासही आहे.

मुंबईत सुरू होणार शोरुम

जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन (EV) उत्पादक कंपनी टेस्ला भारतातील आपलं पहिलं शोरूम मुंबईत उघडणार आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात (BKC) हे शोरुम सुरू होणारे. यासाठी कंपनीने नुकताच करार अंतिम केला आहे. प्रॉपर्टी मार्केटच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टेस्ला बीकेसीतील एका कमर्शियल टॉवरच्या तळमजल्यावर चार हजार स्क्वेअर फूट जागा घेत आहे. येथे तो आपल्या कार मॉडेल्सचं प्रदर्शन आणि विक्री करणार आहे. या जागेसाठी कंपनी दरमहा सुमारे  ३५ लाख रुपये भाडं आकारलं जाणार आहे. हा करार ५ वर्षांसाठी करण्यात आलाय.

Web Title: The country s first Tesla Cybertruck reaches Gujarat big purchase by a diamond merchant from Surat Lavjii Badshah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.