Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > तुम्ही किती खर्च करता हे बँक सांगणार; कशी कराल सुरुवात?

तुम्ही किती खर्च करता हे बँक सांगणार; कशी कराल सुरुवात?

तुम्ही केलेले प्रत्येक पेमेंट, डेबिट कार्डचा वापर, ईएमआय आणि विम्याचे हप्ते तुमच्या बँक खात्यात नोंदविलेले असतात. बँक ॲप या व्यवहारांचे आपोआप अन्न, खरेदी, प्रवास आणि बिले अशा गटांत वर्गीकरण करते. यामुळे याआधारे तुम्ही केवळ ‘इच्छेनुसार’ नाही, तर ‘वस्तुस्थितीनुसार’ आर्थिक नियोजन करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 08:23 IST2026-03-16T08:20:05+5:302026-03-16T08:23:30+5:30

तुम्ही केलेले प्रत्येक पेमेंट, डेबिट कार्डचा वापर, ईएमआय आणि विम्याचे हप्ते तुमच्या बँक खात्यात नोंदविलेले असतात. बँक ॲप या व्यवहारांचे आपोआप अन्न, खरेदी, प्रवास आणि बिले अशा गटांत वर्गीकरण करते. यामुळे याआधारे तुम्ही केवळ ‘इच्छेनुसार’ नाही, तर ‘वस्तुस्थितीनुसार’ आर्थिक नियोजन करू शकता.

The bank will tell you how much you spend; how do you get started | तुम्ही किती खर्च करता हे बँक सांगणार; कशी कराल सुरुवात?

तुम्ही किती खर्च करता हे बँक सांगणार; कशी कराल सुरुवात?


आपण नक्की किती खर्च करतो, या प्रश्नाचे उत्तर देताना अनेकांची तारांबळ उडते. बजेट कोलमडण्याचे मुख्य कारण शिस्तीचा अभाव नसून, पुराव्याऐवजी कल्पनेवर आधारित नियोजन हे आहे. आता मात्र, तुमच्या बँक ॲपमधील ‘स्पेंड ॲनालायझर’ हे फिचर तुमचा हा गोंधळ दूर करून पुराव्यासह हिशोब मांडणार आहे. तुम्ही केलेले प्रत्येक पेमेंट, डेबिट कार्डचा वापर, ईएमआय आणि विम्याचे हप्ते तुमच्या बँक खात्यात नोंदविलेले असतात. बँक ॲप या व्यवहारांचे आपोआप अन्न, खरेदी, प्रवास आणि बिले अशा गटांत वर्गीकरण करते. यामुळे याआधारे तुम्ही केवळ ‘इच्छेनुसार’ नाही, तर ‘वस्तुस्थितीनुसार’ आर्थिक नियोजन करू शकता.

कशी कराल सुरुवात?
बेसलाईन महिना निवडा : सर्वांत आधी असा महिना निवडा जो ‘सामान्य’ आहे. म्हणजे सण-वार किंवा सुट्ट्यांचा काळ नसलेला महिना. यातून तुम्हाला तुमच्या नियमित सवयी (उदा. वारंवार बाहेरून जेवण मागवणे किंवा छोट्या प्रवासासाठी टॅक्सी करणे) लक्षात येतील. सुरुवातीला कोणताही खर्च कमी करण्याचा प्रयत्न करू नका, फक्त निरीक्षण करा.

खर्चाचे दोन भाग करा : खर्चाचे स्थिर खर्च आणि लवचीक खर्च असे दोन भाग करा.
अ) स्थिर खर्च : ईएमआय, भाडे, मुलांची फी, विमा. हे खर्च टाळता येत नाहीत.
ब) लवचिक खर्च : हॉटेलिंग, ऑनलाइन शॉपिंग, किराणा. याच ठिकाणी तुम्ही बदल करून पैसे वाचवू शकता.

सरासरीवर लक्ष द्या : दररोजचा हिशोब ठेवण्यापेक्षा मागील तीन महिन्यांच्या सरासरीवर लक्ष द्या. जर तुमचा हॉटेलिंगचा खर्च सरासरी ९ हजार असेल, तर पुढच्या महिन्यात तो थेट ५ हजार करण्याचे उद्दिष्ट ठेवू नका; ते अपयशी ठरेल. त्याऐवजी तो साडेसात हजारांवर आणण्याचा प्रयत्न करा.

जागरूकता हाच यशाचा मंत्र
बजेट म्हणजे स्वतःवर घातलेली बंधने नसून ती एक ‘जागरूकता’ आहे. महिन्याच्या मध्यात जेव्हा ॲनालायझर तुम्हाला सांगतो की, तुम्ही मर्यादेपेक्षा जास्त खर्च केला आहे, तेव्हा तुमचा हात आपोआप आखडता घेतला जातो. दर तीन महिन्यांनी या खर्चाचा आढावा घेतल्यास ‘लाईफस्टाईल इन्फ्लेशन’ (बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणारा खर्च) वेळीच रोखता येते.

सारांश : तुमचे बँक खाते तुमच्या खर्चाचा आरसा आहे. तो आरसा शांतपणे पाहिला तर आर्थिक स्थैर्य मिळविणे कठीण नाही!

Web Title : बैंक बताएगा आपका खर्च: कैसे करें शुरुआत?

Web Summary : बैंक ऐप के एनालाइजर फीचर से खर्च ट्रैक करें। खर्चों (निश्चित, लचीला) को वर्गीकृत करें और औसत की समीक्षा करें। वित्तीय स्थिरता के लिए जागरूकता जरूरी; जीवनशैली मुद्रास्फीति को नियंत्रित करें।

Web Title : Bank to Track Your Spending: How to Get Started?

Web Summary : Track spending using bank apps' analyzer feature. Categorize expenses (fixed, flexible) and review averages. Awareness is key to financial stability; control lifestyle inflation.