Elon Musk News: गुरुवारी जगातील टॉप १० अब्जाधीशांपैकी ८ जणांच्या निव्वळ संपत्तीत (Net Worth) घट झाली. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांना सर्वाधिक नुकसान झालं. त्यांच्या 'टेस्ला' (Tesla) कंपनीच्या शेअर्समध्ये ६.६४ टक्के घट झाली. ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सनुसार (Bloomberg Billionaires Index), मस्क यांची निव्वळ संपत्ती २०.५ अब्ज डॉलर्सनं घसरून ४३० अब्ज डॉलर्स इतकी राहिली आहे. या वर्षात त्यांच्या निव्वळ संपत्तीत २.८३ अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. अलीकडेच टेस्लाच्या भागधारकांनी मस्क यांच्यासाठी १ ट्रिलियन डॉलरचं पॅकेज मंजूर केलंय.
इतर अब्जाधीशांच्या संपत्तीची स्थिती
लॅरी एलिसन यांच्या निव्वळ संपत्तीत १०.८ अब्ज डॉलरची घट झाली. ते २७५ अब्ज डॉलर्ससह जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. यावर्षी त्यांच्या निव्वळ संपत्तीत ८२.६ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. जेफ बेझोस यांनी गुरुवारी ५.७७ अब्ज डॉलर्स गमावले आणि त्यांची निव्वळ संपत्ती आता २५९ अब्ज डॉलर्स राहिली आहे. लॅरी पेज यांच्या निव्वळ संपत्तीतून ६.३६ अब्ज डॉलर्स कमी झाले, तर सर्गेई ब्रिन यांनी ५.८९ अब्ज डॉलर्स गमावले. फ्रेन्च व्यावसायिक बर्नार्ड आरनॉल्ट यांनी २.०४ अब्ज डॉलर्स, स्टीव बालमर यांनी २.५१ अब्ज डॉलर्स आणि जेन्सन हुआंग यांनी ५.८९ अब्ज डॉलर्स गमावले.
सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
सर्वाधिक कमाई कोणी केली?
फेसबुकची मूळ कंपनी मेटा प्लॅटफॉर्म्सचे (Meta Platforms) सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या खात्यात ३३५ मिलियन डॉलर आले. ते २१६ अब्ज डॉलर्सच्या निव्वळ संपत्तीसह जगातील श्रीमंतांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहेत. प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांच्या निव्वळ संपत्तीत २.५६ अब्ज डॉलर्सची वाढ झाली.
भारतीय अब्जाधीशांची स्थिती
यादरम्यान, भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांच्या निव्वळ संपत्तीत गुरुवारी २९.९ मिलियन डॉलर्सची घट झाली. यासह त्यांची निव्वळ संपत्ती १०६ अब्ज डॉलर राहिली आहे. ते जगातील श्रीमंतांच्या यादीत १८ व्या क्रमांकावर कायम आहेत. यावर्षी त्यांच्या निव्वळ संपत्तीत १५.३ अब्ज डॉलरची वाढ झाली. गौतम अदानी यांच्या निव्वळ संपत्तीत १०८ मिलियन डॉलर्सची वाढ झाली. ते ९०.९ अब्ज डॉलरच्या निव्वळ संपत्तीसह १९ व्या क्रमांकावर आहेत. यावर्षी त्यांच्या निव्वळ संपत्तीत १२.२ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.
