Lokmat Money > बिझनेस न्यूज > Apple अडून राहिली, पण मस्क झुकले; Tesla नं भारताबाबत बदलला आपला ‘प्लान’

Apple अडून राहिली, पण मस्क झुकले; Tesla नं भारताबाबत बदलला आपला ‘प्लान’

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या भारतावर प्रचंड चिडलेले दिसत आहेत. अ‍ॅपल आणि टेस्ला या दोन अमेरिकन कंपन्यांना त्यांनी भारतातील उत्पादनापासून दूर राहण्यास सांगितलंय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 10:27 IST2025-06-03T10:26:49+5:302025-06-03T10:27:34+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या भारतावर प्रचंड चिडलेले दिसत आहेत. अ‍ॅपल आणि टेस्ला या दोन अमेरिकन कंपन्यांना त्यांनी भारतातील उत्पादनापासून दूर राहण्यास सांगितलंय.

tesla elon musk donald trump angry only showrooms might open in india not manufacturing unit details | Apple अडून राहिली, पण मस्क झुकले; Tesla नं भारताबाबत बदलला आपला ‘प्लान’

Apple अडून राहिली, पण मस्क झुकले; Tesla नं भारताबाबत बदलला आपला ‘प्लान’

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या भारतावर प्रचंड चिडलेले दिसत आहेत. अ‍ॅपल आणि टेस्ला या दोन अमेरिकन कंपन्यांना त्यांनी भारतातील उत्पादनापासून दूर राहण्यास सांगितलंय. आयफोन बनवणारी अ‍ॅपल कंपनी ठाम राहिली, पण टेस्लानं त्यांच्यासमोर गुडघे टेकले. भारतात प्रकल्प सुरू करण्याची टेस्लाची कोणतीही योजना अत्यंत चुकीची ठरेल, असे ट्रम्प यांनी फेब्रुवारी महिन्यात म्हटलं होतं. इलॉन मस्क यांनी त्यांची धमकी गांभीर्यानं घेतली आहे. टेस्लाची सध्या भारतात वाहनं बनवण्याची कोणतीही योजना नाही, असे केंद्रीय उद्योगमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी स्पष्ट केलंय.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कुमारस्वामी म्हणाले की, टेस्लाला फक्त भारतात शोरूम उघडायची आहेत आणि बाहेरून वाहनं आणून त्यांची विक्री करायची आहे. मस्क यांना गेल्या अनेक वर्षांपासून भारतात व्यवसाय करायचा होता, पण त्यांना अद्याप यश आलेलं नाही. टेस्लानं नुकतीच भारतात काही शोरूमसाठी जागा निश्चित केली आहे. टेस्ला लवकरच भारतात वाहनांची विक्री सुरू करू शकते, अशी चिन्ह दिसत आहेत.

कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन

टेस्लाच्या गिगाफॅक्टरीमुळे भारताच्या मॅन्युफॅक्चरिंग आणि टेक्नॉलॉजी क्षेत्राला चालना मिळू शकते. या प्रकल्पांमध्येही ईव्ही, बॅटरी आणि चार्जिंग सोल्युशन्स बनवता येतात. पण टेस्ला पूर्णपणे भारतात येईल का? टेस्ला थेट ग्राहकांना कार विकते, पण भारतात डीलर्सच्या माध्यमातून वाहने विकली जातात. त्यामुळे टेस्लाला विक्रीची पद्धत बदलावी लागू शकते.

किती असेल किंमत?

कार खरेदी केल्यानंतर सेवा पुरवणंही खूप गरजेचं आहे. टेस्ला ही सेवा कशी पुरवणार हेही पाहावं लागेल. याशिवाय भारतातील वाहनांच्या किमतीही खूप महत्त्वाच्या आहेत. येथील बहुतांश लोक २० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीची वाहने खरेदी करतात. सर्वात स्वस्त टेस्ला मॉडेल ३ ची किंमत अमेरिकेत ४२,४९० डॉलर (सुमारे ३७ लाख रुपये) आहे. टॅक्सनंतर ही कार भारतात खूप महाग होणार आहे. सुरुवातीला या गाड्या जर्मनीतून आयात केल्या जाणार आहेत. करानंतर त्यांची किंमत आणखी वाढू शकते. मस्क यांनी जानेवारीमध्ये २०२५ च्या पहिल्या सहामाहीत स्वस्त मॉडेल्स लाँच करण्याचे संकेत दिले होते.

Web Title: tesla elon musk donald trump angry only showrooms might open in india not manufacturing unit details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.