Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > FD करायचीय? मग बायकोच्या नावे करा गुंतवणूक; व्याजासोबत टॅक्समध्येही होईल मोठी बचत

FD करायचीय? मग बायकोच्या नावे करा गुंतवणूक; व्याजासोबत टॅक्समध्येही होईल मोठी बचत

FD Scheme : जर एखाद्या व्यक्तीला आर्थिक वर्षात एफडीवर ५०,००० रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळाले तर त्याला १० टक्के टीडीएस भरावा लागेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 11:39 IST2026-03-08T11:38:39+5:302026-03-08T11:39:28+5:30

FD Scheme : जर एखाद्या व्यक्तीला आर्थिक वर्षात एफडीवर ५०,००० रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळाले तर त्याला १० टक्के टीडीएस भरावा लागेल.

Tax Saving Tips How Investing in Your Wife's Name via Bank FD Can Save You Money | FD करायचीय? मग बायकोच्या नावे करा गुंतवणूक; व्याजासोबत टॅक्समध्येही होईल मोठी बचत

FD करायचीय? मग बायकोच्या नावे करा गुंतवणूक; व्याजासोबत टॅक्समध्येही होईल मोठी बचत

Bank FD : आजच्या धावपळीच्या युगात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असूनही, भारतीय कुटुंबांचा 'बँक एफडी'वर असलेला विश्वास आजही अढळ आहे. सुरक्षितता आणि निश्चित परतावा यामुळे एफडी हा आजही पसंतीचा पर्याय आहे. मात्र, अनेकदा नोकरीपेशा व्यक्ती स्वतःच्याच नावाने एफडी करतात, ज्यामुळे त्यांना व्याजावर मोठा प्राप्तिकर भरावा लागतो. जर तुम्ही हीच गुंतवणूक तुमच्या पत्नीच्या नावाने केली, तर तुम्ही कायदेशीररीत्या हजारो रुपयांचा टॅक्स वाचवू शकता.

टीडीएसचा आर्थिक फटका कसा टाळाल?
नियमांनुसार, जर एका आर्थिक वर्षात एफडीवरील व्याज ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल, तर बँका १० टक्के टीडीएस कापतात. जर पॅन कार्ड नसेल, तर हा टॅक्स थेट २० टक्क्यांपर्यंत जातो.

पत्नीच्या नावाचा फायदा
बऱ्याच कुटुंबांत पत्नी गृहिणी असते किंवा तिचे उत्पन्न कमी असते. जर तुमच्या पत्नीचे एकूण वार्षिक उत्पन्न टॅक्स मर्यादेपेक्षा (नवीन प्रणालीनुसार ४ लाख आणि जुन्या प्रणालीनुसार २.५ लाख) कमी असेल, तर एफडीच्या व्याजावर कोणताही टीडीएस कापला जात नाही. यासाठी बँकेत '१५जी' फॉर्म भरून तुम्ही टॅक्स वाचवू शकता.

'इनकम क्लबिंग' आणि टॅक्स स्लॅबचे गणित
एफडीवर मिळणारे व्याज हे तुमच्या एकूण उत्पन्नात मोजले जाते. समजा तुमचे वार्षिक उत्पन्न १२ लाख रुपये आहे आणि तुम्हाला एफडीतून २.२ लाख रुपये व्याज मिळाले, तर तुमचे एकूण उत्पन्न १४.२ लाख रुपये धरले जाईल. यामुळे तुम्ही उच्च टॅक्स स्लॅबमध्ये येता आणि तुम्हाला जास्त टॅक्स भरावा लागतो. पण, जर ही एफडी पत्नीच्या नावाने असेल आणि तिचे स्वतःचे उत्पन्न नसेल, तर त्या व्याजावर तिला वैयक्तिक टॅक्स सवलतीचा फायदा मिळेल आणि तुमच्या उत्पन्नावरील टॅक्सचा बोजा वाढणार नाही.

वाचा - वारसा नव्हे, कर्तृत्वाने गाजवतायत जग! 'या' ६ महिलांनी बदलला भारतीय व्यवसायाचा नकाशा

'जॉइंट एफडी'चा पर्यायही फायदेशीर
जर तुम्हाला जॉइंट एफडी करायची असेल, तर पत्नीचे नाव 'फर्स्ट होल्डर' म्हणून ठेवा. अशा स्थितीत टॅक्सची गणना पहिल्या खातेदाराच्या उत्पन्नावर केली जाते, ज्यामुळे टॅक्स वाचवण्यास मदत होते. हा फायदा प्रामुख्याने ज्यांची पत्नी नोकरी करत नाही किंवा उत्पन्नाच्या कमी टप्प्यात आहे, त्यांना घेता येईल.
 

Web Title : पत्नी के नाम पर FD करें, टैक्स और ब्याज दोनों बचाएं!

Web Summary : पत्नी के नाम पर एफडी में निवेश करके टैक्स बचाया जा सकता है। यदि उसकी आय कर योग्य सीमा से कम है तो टीडीएस से बचा जा सकता है। पत्नी को पहला धारक बनाकर संयुक्त एफडी भी टैक्स कम करने में मदद करती है। यह गृहिणियों के लिए विशेष रूप से फायदेमंद है।

Web Title : Invest in FD in wife's name, save tax and interest!

Web Summary : Investing in an FD in your wife's name can save significant tax. TDS can be avoided if her income is below the taxable limit. Joint FDs with the wife as the first holder also help reduce tax burdens. This is especially beneficial for homemakers.