Lokmat Money > बिझनेस न्यूज > ५२ आठवड्यांच्या नीचांकी स्तरावर पोहोचला Tata चा 'हा' शेअर, ९ दिवसांपासून सातत्यानं होतेय घसरण

५२ आठवड्यांच्या नीचांकी स्तरावर पोहोचला Tata चा 'हा' शेअर, ९ दिवसांपासून सातत्यानं होतेय घसरण

Tata Motors share price: कंपनीचे शेअर्स आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवरून ४६ टक्क्यांनी घसरले आहेत. ज्यामुळे कंपनीचं मार्केट कॅप २ लाख कोटी रुपयांनी घसरले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 13:56 IST2025-02-28T13:54:55+5:302025-02-28T13:56:11+5:30

Tata Motors share price: कंपनीचे शेअर्स आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवरून ४६ टक्क्यांनी घसरले आहेत. ज्यामुळे कंपनीचं मार्केट कॅप २ लाख कोटी रुपयांनी घसरले आहे.

tata motors share price 52 weeks low today down by 2 percent 46 percent down till date | ५२ आठवड्यांच्या नीचांकी स्तरावर पोहोचला Tata चा 'हा' शेअर, ९ दिवसांपासून सातत्यानं होतेय घसरण

५२ आठवड्यांच्या नीचांकी स्तरावर पोहोचला Tata चा 'हा' शेअर, ९ दिवसांपासून सातत्यानं होतेय घसरण

Tata Motors share price: टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये आज २ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. या घसरणीनंतर बीएसईवर कंपनीचा शेअर ६३०.१५ रुपयांवर आला. ही या शेअरची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी आहे. सलग नवव्या दिवशी कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत घसरण झाली. टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये जोरदार विक्री दिसून येत आहे. टाटा मोटर्सचे शेअर्स आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवरून ४६ टक्क्यांनी घसरले आहेत. ज्यामुळे कंपनीचं मार्केट कॅप २ लाख कोटी रुपयांनी घसरले आहे.

घसरणीमागचं कारण काय?

टाटा मोटर्सच्या शेअर्सच्या या घसरणीमागे जग्वार लँड रोव्हरचा चीन आणि ब्रिटनच्या बाजारपेठेतील कमकुवत दृष्टीकोन असल्याचं मानलं जात आहे. याशिवाय देशांतर्गत प्रवासी वाहन विभागातही मंदीचं सावट दिसून येत आहे. याशिवाय युरोपमध्ये तयार होणाऱ्या वाहनांवरील प्रस्तावित शुल्कामुळे जेएलआरची विक्रीवरही संकट दिसून येत आहे. जे रिटेल व्हॉल्युमच्या २५ टक्के इतकं आहे.

ब्रोकरेज हाऊसचं म्हणणं काय?

टाटा मोटर्सच्या विक्रीवर फेब्रुवारी महिन्यात परिणाम झाला आहे. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या अहवालानुसार, टाटा मोटर्सच्या वाहन विक्रीत फेब्रुवारीमध्ये ५.७ टक्क्यांची घसरण होण्याची शक्यता आहे. यावेळी ८१,५०५ युनिट्सची विक्री होऊ शकते. वर्षभरापूर्वी याच महिन्यात ८६,४०६ वाहनांची विक्री झाली होती.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी महिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: tata motors share price 52 weeks low today down by 2 percent 46 percent down till date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.