Lokmat Money > बिझनेस न्यूज > अमेरिकी टेस्लाला मिळणार टाटा समूहाची साथ; मोठी डील झाली, पुणे की गुजरात...

अमेरिकी टेस्लाला मिळणार टाटा समूहाची साथ; मोठी डील झाली, पुणे की गुजरात...

Tata Partnership with Tesla: टाटा समूहाच्या कंपन्या टेस्लासाठी जागतिक पुरवठादार बनल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 14:43 IST2025-03-21T13:34:47+5:302025-03-21T14:43:26+5:30

Tata Partnership with Tesla: टाटा समूहाच्या कंपन्या टेस्लासाठी जागतिक पुरवठादार बनल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे.

Tata Group companies have become global suppliers to elon musk Tesla | अमेरिकी टेस्लाला मिळणार टाटा समूहाची साथ; मोठी डील झाली, पुणे की गुजरात...

अमेरिकी टेस्लाला मिळणार टाटा समूहाची साथ; मोठी डील झाली, पुणे की गुजरात...

Tata Partnership with Tesla : अब्जाधीश इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीची इलेक्ट्रीक कार लवकरच भारतीय रस्त्यांवर धावताना पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे टेस्ला कारमध्ये आता टाटा कंपनीचे पार्ट लागणार आहेत. टाटा समूहाने मस्क यांच्या टेस्ला कंपनीशी करार केला आहे. त्यानुसार, टाटा ऑटोकॉम्प, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा टेक्नॉलॉजीज आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्स टेस्ला कंपनीचे जागतिक पुरवठादार बनले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा ग्रुपने अमेरिकन इलेक्ट्रिक व्हेइकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी टेस्लासोबत वाहन घटकांचा जागतिक पुरवठादार म्हणून भागीदारी केली आहे.

टेस्ला अधिकाऱ्यांकडून स्थानिक पुरवठादारांची भेट
टेस्ला कार भारतात आणण्यासाठी मस्क यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. टेस्लाचे अधिकारी कास्टिंग, फोर्जिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि फॅब्रिकेशनच्या विकास आणि उत्पादनावर चर्चा करण्यासाठी स्थानिक पुरवठादारांची भेट घेतल्याचेही मीडिया रिपोर्ट्समधून समोर आले आहे. आधीच अनेक भारतीय कंपन्या टेस्लाला अनेक वाहन घटक पुरवत आहेत. यामध्ये संवर्धन मदरसन, सुप्रजीत इंजिनिअरिंग, सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन फोर्जिंग्ज, व्हॅरोक इंजिनिअरिंग, भारत फोर्ज आणि संधर टेक्नॉलॉजीज यांचा समावेश आहे.

ईव्ही तंत्रज्ञानात टाटा अग्रेसर
ऑटोकॉम्प टाटाच्या इकोसिस्टममध्ये ईव्ही अभियांत्रिकी उत्पादने तयार करते. तर टाटा टेक्नॉलॉजी आउटसोर्स उत्पादन अभियांत्रिकी सेवा तसेच डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सेवा आणि विविध उत्पादनांसाठी अपस्किलिंग सोल्यूशन्स देते. तर TCS सर्किट-बोर्ड तंत्रज्ञानाचा पुरवठा करते आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन युनिटच्या निर्मितीनंतर चिप्स तयार करते. टेस्ला राजस्थान, गुजरात, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि तेलंगणा यांसारख्या अनेक राज्यांच्या सरकारांशी भारतात आपले उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी चर्चा करत आहे.

Web Title: Tata Group companies have become global suppliers to elon musk Tesla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.