Tata Capital IPO price band: गुंतवणूकदारांची प्रतीक्षा अखेर आज, सोमवारी, संपली आहे. टाटा कॅपिटलनं त्यांच्या IPO साठी प्राईस बँड (Price Band) जाहीर केलाय. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, या इश्यूचा प्राईस बँड प्रति शेअर ३१० रुपयांपासून ३२६ रुपये इतका असेल. शेअर्सचं फेस व्हॅल्यू (Face Value) १० रुपये निश्चित करण्यात आली आहे. या IPO साठी लॉट साईज ४६ शेअर्सचा असेल.
मुख्य तारखा:
रिटेल गुंतवणूकदारांसाठी उघडण्याची तारीख: ६ ऑक्टोबर
दावा लावण्याची अंतिम तारीख: ८ ऑक्टोबर
अँकर गुंतवणूकदारांसाठी उघडण्याची तारीख: ३ ऑक्टोबर
शेअर वाटप (Allotment): १० ऑक्टोबर
बीएसई-एनएसईवर लिस्टिंगची प्रस्तावित तारीख: १३ ऑक्टोबर, सोमवार
कोणासाठी किती हिस्सा आरक्षित?
टाटा कॅपिटलच्या IPO मध्ये विविध गुंतवणूकदारांसाठी पुढीलप्रमाणे हिस्सा आरक्षित ठेवण्यात आला आहे:
पात्र संस्थात्मक खरेदीदार (Qualified Institutional Buyers - QIBs): कमाल ५० टक्के हिस्सा.
गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार (Non-Institutional Investors - NIIs): १५ टक्के हिस्सा.
रिटेल गुंतवणूकदार (Retail Investors): कमीत कमी ३५ टक्के हिस्सा.
IPO चे तपशील:
टाटा समूहाच्या या IPO मध्ये नवीन शेअर्स (Fresh Issue) आणि विक्रीसाठी ऑफर (Offer For Sale - OFS) या दोन्हींचा समावेश आहे. कंपनी २१ कोटी शेअर्स फ्रेश इश्यूद्वारे जारी करेल. विक्रीसाठी ऑफरद्वारे (OFS) कंपनी २६.५८ कोटी शेअर्स जारी करेल. टाटा सन्स तर्फे २३ कोटी शेअर्स विकले जात आहेत. तर इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनतर्फे (IFC) ३.५८ कोटी शेअर्स विकले जात आहेत. सध्या टाटा सन्सकडे टाटा कॅपिटलचा ८८.६० टक्के हिस्सा आहे, तर आयएफसीकडे १.८ टक्के हिस्सा आहे.
आजचा जीएमपी (GMP) काय आहे?
टाटा कॅपिटलच्या जीएमपी (ग्रे मार्केट प्रीमियम) मध्ये वाढ झाली आहे. 'इन्व्हेस्टर्स गेन'च्या रिपोर्टनुसार, IPO ग्रे मार्केटमध्ये आज २८ रुपयांच्या प्रीमियमवर (Premium) ट्रेड करत आहे. यापूर्वी, २७ सप्टेंबर रोजी टाटा कॅपिटलच्या IPO चा जीएमपी घसरून २० रुपये झाला होता.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)