नवी दिल्ली: टाटा समूहाच्या बहुप्रतीक्षित टाटा कॅपिटल लिमिटेडच्या शेअरने सोमवारी शेअर बाजारात प्रवेश केला आहे. कंपनीचा शेअर बीएसई आणि एनएसईवर ३२६ रुपयांच्या इश्यू किमतीपेक्षा १.२२ टक्क्यांच्या वाढीसह ३३० रुपयांवर सूचीबद्ध झाला..
सोमवारी सकाळच्या सत्रात टाटा कॅपिटलचे बाजार मूल्यांकन सुमारे १,३८,६५८ कोटी रुपये इतके झाले. या लिस्टिंगने टाटा समूहासाठी जवळपास दोन वर्षानंतरचा पहिला आयपीओ ठरला आहे.
टाटा कॅपिटलच्या १५,५१२ कोटी रुपयांच्या आयपीओला बुधवारी पूर्ण सदस्यता मिळाली होती. हा यंदाच्या वर्षातील सर्वात मोठा आयपीओ ठरला आहे. कंपनीने आपल्या शेअर्ससाठी ३१० ते ३२६ रुपये अशी किंमत ठेवली होती. यात २१ कोटींचे नवे शेअर्स आणि २६.५८ कोटी शेअर्सच्या विक्री प्रस्तावाचा समावेश होता.