Swiggy 99 Store: तुम्हाला स्वस्त ऑनलाइन फूड पर्याय मिळत नसतील, तर Swiggy ने तुमच्यासाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. कंपनीने '९९ स्टोअर' सुरू केले असून, कंपनीच्या सध्याच्या अॅपद्वामध्येच याचे ऑप्शन मिळेल. याद्वारे कंपनी फक्त ९९ रुपयांमध्ये सिंगल सर्व्ह मील, म्हणजेच फूल जेवण देणार आहे. ही सेवा १७५ हून अधिक शहरांमध्ये उपलब्ध असेल.
१७५ शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध असेल
या ९९ स्टोअरद्वारे अतिशय कमी किमतीत युजर्सना फूल जेवण मिळणार आहे. सध्या हे ९९ स्टोअर बंगळुरू, अहमदाबाद, कोलकाता, हैदराबाद, दिल्ली, पुणे, चेन्नई, लखनऊ, वडोदरा यासह अनेक शहरांमध्ये सुरू करण्यात आले आहे. या ९९ स्टोअरमध्ये ग्राहकांना ९९ रुपयांपर्यंतच्या रेडी-टू-ईट डिशेस मिळतील. या डिशेस ताज्या ऑर्डरवर तयार केल्या जातील. ग्राहकांना रोल, बिर्याणी, नूडल्स, नॉर्थ इंडिया, साउथ इंडियन, बर्गर, पिझ्झा आणि केक असे अनेक पर्याय मिळतील.
९९ स्टोअर अॅपमध्येच उपलब्ध असेल
स्विगीच्या फूड मार्केटप्लेसचे सीईओ रोहित कपूर म्हणतात, '९९ रुपयांत जेवण, ही केवळ किमतीची बाब नाही, तर एक विश्वास आहे.' तुम्हाला हे स्टोअर सध्याच्या स्विगी अॅपमध्येच मिळेल. यासाठी, तुम्हाला अॅप उघडावे लागेल आणि फूड्सच्या पर्यायावर जावे लागेल. येथे तुम्हाला ९९ स्टोअरचा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करताच तुम्हाला या सेगमेंटमध्ये येणारे सर्व पर्याय दिसू लागतील.