मुंबई - तब्बल ११८ वर्षांचा समृद्ध वारसा असलेल्या एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडने (द शामराव विठ्ठल को-ऑपरेटिव्ह बँक) आधार-आधारित डिजिटल डीमॅट अकाऊंट सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ग्राहकांना फक्त दहा मिनिटांत सहजपणे ऑनलाइन डीमॅट अकाऊंट उघडता येईल.
एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लि.चे अध्यक्ष दुर्गेश चंदावरकर यांच्या हस्ते या नवीन डिजिटल डीमॅट अकाउंट प्लॅटफॉर्मचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी चंदावरकर म्हणाले की, ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी तंत्रज्ञानाचा पुुरेपूर वापर करण्याची आमची वचनबद्धता या डिजिटल उपक्रमातून दिसून येते. (वा. प्र.)