Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Post Office ची सुपरहिट स्कीम, ५ लाखांच्या गुंतवणूकीवर मिळेल २ लाखांचं व्याज, पाहा डिटेल्स

Post Office ची सुपरहिट स्कीम, ५ लाखांच्या गुंतवणूकीवर मिळेल २ लाखांचं व्याज, पाहा डिटेल्स

पाहा कोणती आहे ही स्कीम आणि काय आहेत याचे फायदे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 12:12 IST2023-08-14T12:12:34+5:302023-08-14T12:12:59+5:30

पाहा कोणती आहे ही स्कीम आणि काय आहेत याचे फायदे...

Superhit scheme of Post Office 5 lakhs investment will get 2 lakhs interest see details senior citizen saving scheme | Post Office ची सुपरहिट स्कीम, ५ लाखांच्या गुंतवणूकीवर मिळेल २ लाखांचं व्याज, पाहा डिटेल्स

Post Office ची सुपरहिट स्कीम, ५ लाखांच्या गुंतवणूकीवर मिळेल २ लाखांचं व्याज, पाहा डिटेल्स

भविष्यासाठी गुंतवणूक करणं आवश्यक आहे. पोस्ट ऑफिसची ही स्कीम ज्येष्ठ नागरिक आणि जे कर्मचारी निवृत्त होणार आहेत त्यांच्यासाठी अधिक फायद्याची आहे. ही सरकारी योजना त्या लोकांसाठी आहे, ज्यांचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे. तसंच ज्यांनी नोकरीतून व्हिआरएस घेतलीये त्यांच्यासाठीही ही स्कीम फायद्याची ठरू शकते. यावरील व्याजदर एफडी किंवा सेव्हिंग अकाऊंटपेक्षा अधिक अधिक असतात. सध्या यावर 8.2 टक्के व्याज दिलं जातंय. पाहूया या स्कीमशी निगडीत महत्त्वाच्या बाबी.

5 वर्षांत मॅच्युअर होते स्कीम
ज्येष्ठ नागरिकांना त्यांची बचत अशा ठिकाणी करणे आवडते, जिथे त्यांना चांगले परतावा मिळू शकेल आणि त्यांचे पैसेही सुरक्षित असतील. यामुळे, बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचा कल एफडीकडे असतो. अशा लोकांसाठी ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Saving Scheme- SCSS) खूप उपयुक्त ठरू शकते. 

या खात्यात किमान 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 30 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. योजनेत रक्कम 1000 च्या पटीत जमा केली जाते. जमा रकमेवर तिमाही आधारावर व्याज दिलं जातं. खाते उघडल्याच्या तारखेपासून 5 वर्षांनी जमा रक्कम मॅच्युअर होते. ठेवीदाराची इच्छा असल्यास, रक्कम मॅच्युअर झाल्यानंतरही तीन वर्षांसाठी खात्याची मुदत वाढवू शकतो. परंतु हा पर्याय एकदाच उपलब्ध आहे.

5, 10, 15, 20 आणि 30 लाखावर किती व्याज 
जर तुम्ही या योजनेत 5 लाख रुपये गुंतवले तर 8.2 टक्के दरानं तुम्हाला 2,05,000 रुपये व्याज मिळतील. अशा प्रकारे तुम्हाला मॅच्युरिटीवर 7,05,000 रुपये मिळतील. 10 लाख रुपये जमा केल्यावर तुम्हाला मॅच्युरिटीवर 14,10,000 रुपये मिळतील, 15 लाख रुपये जमा केल्यावर तुम्हाला मॅच्युरिटीवर 21,15,000 रुपये मिळतील, 20 लाख रुपये जमा केल्यावर तुम्हाला 28,20,000 रुपये आणि 30 लाख रुपये जमा केल्यानंतर मॅच्युरिटीवर 42,30,000 रुपये मिळतील.

स्कीमचे फायदे

  • ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही भारत सरकारद्वारे समर्थित एक स्मॉल सेव्हिंग स्कीम आहे. म्हणून ती विश्वसनीय आणि सुरक्षित पर्यायांपैकी एक मानली जाते.
  • हे खाते भारतात कुठेही हस्तांतरित केले जाऊ शकते.
  • प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, तुम्ही या योजनेत गुंतवणूक करून प्रति वर्ष 1.5 लाख रुपयांच्या कर सूटचा दावा करू शकता.
  • या योजनेंतर्गत दर तीन महिन्यांनी व्याज दिले जाते. प्रत्येक एप्रिल, जुलै, ऑक्टोबर आणि जानेवारीच्या पहिल्या दिवशी तुमच्या खात्यात व्याज जमा केले जाते.

Web Title: Superhit scheme of Post Office 5 lakhs investment will get 2 lakhs interest see details senior citizen saving scheme