Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?

Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?

Success Story Of Excitel Vivek Raina: ब्रॉडबँड मार्केटमध्ये 'एक्साइटेल' (Excitel) हे नाव आता कोणालाही नवीन राहिलेलं नाही. ही देशातील वेगानं वाढणाऱ्या ब्रॉडबँड कंपन्यांपैकी एक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 12:38 IST2026-04-03T12:33:44+5:302026-04-03T12:38:34+5:30

Success Story Of Excitel Vivek Raina: ब्रॉडबँड मार्केटमध्ये 'एक्साइटेल' (Excitel) हे नाव आता कोणालाही नवीन राहिलेलं नाही. ही देशातील वेगानं वाढणाऱ्या ब्रॉडबँड कंपन्यांपैकी एक आहे.

Success Story From a salary of 10000 to a business of 400 crores what was the journey of Vivek Raina from Jammu and Kashmir who provides excitel broadband services | Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?

Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?

Success Story Of Excitel Vivek Raina: ब्रॉडबँड मार्केटमध्ये 'एक्साइटेल' (Excitel) हे नाव आता कोणालाही नवीन राहिलेलं नाही. ही देशातील वेगानं वाढणाऱ्या ब्रॉडबँड कंपन्यांपैकी एक आहे. सामान्यतः एअरटेल, जिओ, टाटा आणि बीएसएनएलच्या तुलनेत एक्साइटेलचे प्लॅन्स स्वस्त असतात. या कंपनीचे संस्थापक विवेक रैना यांचा जन्म श्रीनगरमध्ये झाला होता. १९९० मध्ये काश्मीरमधील अशांततेमुळे त्यांना आपलं घर सोडावं लागलं होतं, मात्र त्यांनी हार मानली नाही आणि आपल्या मेहनतीनं एक मोठं स्थान निर्माण केलं.

विवेक रैना यांनी अवघ्या १०,००० रुपयांच्या पगारावर आपल्या करिअरची सुरुवात केली होती. आज त्यांनी ४०० कोटी रुपयांची इंटरनेट उलाढाल असलेला व्यवसाय उभा केलाय. २०१५ मध्ये त्यांनी 'एक्साइटेल' या इंटरनेट सेवा पुरवठादार कंपनीची सुरुवात केली. प्रतिकूल परिस्थितीत यश कसं मिळवावं, याचं विवेक रैना हे आजच्या तरुणांसाठी एक उत्तम उदाहरण आहेत.

युद्धाचा परिणाम, 'या' डिझेलच्या दरात २८ रुपयांची वाढ; पाहा कोणावर पडणार आर्थिक भार

आलिशान घर सोडून व्हावं लागलं विस्थापित

'द वीकेंड लीडर'मधील वृत्तानुसार, श्रीनगरमध्ये विवेक यांचे १४ खोल्यांचं एक आलिशान घर होतं. मात्र, नववीत शिकत असताना काश्मिरी पंडितांच्या स्थलांतराच्या काळात, त्यांना श्रीनगर सोडावं लागलं. त्यानंतर त्यांना जम्मूमध्ये एका भाड्याच्या घरात राहावं लागलं. अशा कठीण काळातही त्यांच्या पालकांनी मुलांच्या शिक्षणावर पूर्ण लक्ष केंद्रित केलं.

या सर्व आव्हानांचा सामना करत विवेक यांनी एमबीएची पदवी पूर्ण केली. त्यांची पहिली नोकरी 'हॅथवे' (Hathway) कंपनीत लागली, जिथे त्यांना १०,००० रुपये पगार मिळायचा. ही कंपनी तेव्हा छोट्या कार्यालयांना ब्रॉडबँड कनेक्शन विकण्याचं काम करायची. त्यानंतर त्यांनी रिलायन्स, ब्रॉडबँड पेसनेट आणि डिजिकेबल यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केलं.

एक्साइटेलची स्थापना आणि विस्तार

नोकरी करत असतानाच विवेक यांना काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती आणि त्यांच्या डोक्यात नवनवीन कल्पना येत होत्या. अखेर २०१५ मध्ये त्यांनी 'एक्साइटेल' या कंपनीची स्थापना केली. त्यांनी बल्गेरियातील उद्योजकांच्या सहकार्यानं ही कंपनी सुरू केली.

या कंपनीचे मुख्यालय दिल्लीत असून आज ही कंपनी भारताच्या ३० पेक्षा जास्त शहरांमध्ये इंटरनेट सेवा पुरवते. कंपनीची वार्षिक उलाढाल आता ४०० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. एक्साइटेल सध्या सुमारे नऊ लाख ग्राहकांना हाय-स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटीसह फायबर ब्रॉडबँड सेवा प्रदान करत आहे.

Web Title : 10,000 रुपये वेतन से 400 करोड़ का कारोबार: एक्साइटेल की सफलता की कहानी

Web Summary : एक्सिटेल के संस्थापक विवेक रैना ने विस्थापन और साधारण शुरुआत से उबरकर 400 करोड़ रुपये का ब्रॉडबैंड व्यवसाय बनाया। 10,000 रुपये के वेतन से शुरुआत करते हुए, उन्होंने चुनौतियों का सामना किया, एक्सिटेल को 30+ भारतीय शहरों में एक प्रमुख इंटरनेट प्रदाता के रूप में स्थापित किया, जो नौ लाख ग्राहकों को सेवा प्रदान करता है।

Web Title : From ₹10,000 Salary to ₹400 Crore Business: Excitel's Success Story

Web Summary : Vivek Raina, founder of Excitel, overcame displacement and humble beginnings to build a ₹400 crore broadband business. Starting with a ₹10,000 salary, he persevered through challenges, establishing Excitel as a leading internet provider across 30+ Indian cities, serving nine lakh customers.