lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Success Story : क्रेडिट कार्ड पेमेंट रिवॉर्डिंग बनवून CRED ला बनवलं युनिकॉर्न, पाहा कशी झाली मोठी कंपनी

Success Story : क्रेडिट कार्ड पेमेंट रिवॉर्डिंग बनवून CRED ला बनवलं युनिकॉर्न, पाहा कशी झाली मोठी कंपनी

जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि अनेक क्रेडिट कार्ड्स असल्यामुळे त्याची बिले, तारखा आणि पेमेंट शेड्यूल इत्यादी विसरून गेलात, तर यासाठी CRED ॲप तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरते.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 04:01 PM2023-01-09T16:01:46+5:302023-01-09T16:02:11+5:30

जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि अनेक क्रेडिट कार्ड्स असल्यामुळे त्याची बिले, तारखा आणि पेमेंट शेड्यूल इत्यादी विसरून गेलात, तर यासाठी CRED ॲप तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरते.

Success Story CRED became a unicorn by making credit card payment rewards see how it became a big company million dollars | Success Story : क्रेडिट कार्ड पेमेंट रिवॉर्डिंग बनवून CRED ला बनवलं युनिकॉर्न, पाहा कशी झाली मोठी कंपनी

Success Story : क्रेडिट कार्ड पेमेंट रिवॉर्डिंग बनवून CRED ला बनवलं युनिकॉर्न, पाहा कशी झाली मोठी कंपनी

Cred Success Story : जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि अनेक क्रेडिट कार्ड्स असल्यामुळे त्याची बिले, तारखा आणि पेमेंट शेड्यूल इत्यादी विसरून गेलात, तर यासाठी CRED ॲप तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरते. तुम्हाला एसएमएस किंवा व्हॉट्सॲपवर क्रेड वेळोवेळी माहितीही देत असते, त्यामुळे तुमचे पेमेंट डिफॉल्टही होत नाही.

क्रेडची स्थापना करणाऱ्या कुणाल शाह यांचा जन्म 20 मे 1983 रोजी झाला. 2018 मध्ये, कुणाल शाह यांनी एक ट्रस्ट कंपनी म्हणून क्रेडची स्थापना केली आहे, तो याला फिनटेक व्यवसाय मानत नाही. CRED च्या स्थापनेमागील मुख्य उद्देश भारतीय समाजातील ट्रस्ट इश्यूचे निराकरण करणे होते. भारतीय समाजामध्ये विश्वास निर्माण करून त्याला आर्थिक प्रगतीच्या मार्गावर नेले जाऊ शकते, असा विश्वास कुणाल शाह यांनी व्यक्त केला.

क्रेडशी संबंधित हा अनुभव डेल्टा उत्पादनासारखा आहे, यामुळे लोकांच्या वर्तनात बदल घडू शकतो. रिलायन्सची कंपनी जिओने आपल्या कामकाजाच्या सुरुवातीलाच असे पाऊल उचलले होते. त्यांनी प्रथम ग्राहकांना प्लेबुक मोफत वापरण्यासाठी दिले आणि आता यातून कंपनीला 20,000 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळत आहे.

प्रीमिअम ग्राहकांवर नजर
Cred भारतातील प्रीमियम वापरकर्त्यांचा सर्वोत्तम डेटाबेस तयार करत आहे. ज्या लोकांना क्रेडिट कार्ड घ्यायचे आहे आणि ज्यांचा सिबिल स्कोर चांगला आहे, अशा लाखो लोकांची माहिती CRED कडे उपलब्ध आहे. भारतात या श्रेणीतील टॉप 2 टक्के लोक आहेत. सध्या भारतात 4-5 कोटी क्रेडिट कार्ड धारकांना सुमारे 8 कोटी क्रेडिट कार्ड जारी केले जातात. यापैकी 3-4 कोटी लोक असे आहेत ज्यांच्याकडे क्रेडिट कार्ड आहे आणि ज्यांचा सिबिल खूप चांगला आहे.

पहिल्याच बॉलवर सिक्स
तीन कोटी भारतीय क्रेडचे प्रमुख टार्गेट आहेत. परंतु क्रेडने पहिल्याच बॉलमध्ये सिक्स मारलाय. फ्रीचार्जच्या माध्यमातून कमी व्हॅल्यूतून मोठी कम्युनिटी ऑर्गनायझेशन निर्माण होऊ शकते हे कुणाल शाह यांनी पाहिले होते. यानंतर कुणाल शाह यांनी प्रीमियम ग्राहक आपले टार्गेट ठेवले. देशातील लोकसंख्येच्या मोठ्या वर्गाशी संबंधित व्यवसाय त्यांना करायचा नव्हता.

क्रेडला फंडिंग
भारतातील प्रीमियम सेगमेंटची लोकसंख्या मर्यादित आहे. 30 दशलक्ष डॉलर्सची रक्कम कशी उभी करायची ही शाह यांची कल्पना आहे. यानंतर क्रेडने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. व्हायरल मार्केटिंगमुळे क्रेड अॅपचे लाखो ग्राहक तयार झाले. क्रेडवर साइन अप करण्यासाठी अनेक फ्रीबीजच्या घोषणा करण्यात आल्या. अनेकांना क्रेडिट जॉईन केल्यावर मोफत ग्रुमिंग किट मिळत असल्याचं कळलं, त्यामुळे लोक रेफरन्सद्वारे क्रेड जॉईन करू लागले.

वेळेत कार्ड पेमेंट
CRED ने त्यांच्या क्रेडिट कार्डची बिले वेळेवर भरण्याची आणि त्यावर रोख रक्कम आणि बक्षिसे मिळवण्याची संधी देऊन आपले स्थान निर्माण केले. वेळोवेळी क्रेडिट कार्डचे पेमेंट करण्यासाठी क्रेड आठवण करून देते. अलीकडच्या काळात, क्रेडने घरभाडे भरणे, फ्लेक्सिबल क्रेडिट लाइन आणि क्रेडिट मिंट सारख्या सेवा देखील सुरू केल्या आहेत. जून 2022 मध्ये, क्रेडचे मूल्यांकन 6.5 अब्ज डॉलर्स असल्याचे म्हटले जात होते.

क्रेडचा महसूल
आर्थिक वर्ष 2021 मध्ये क्रेडचा महसूल 11.55 दशलक्ष-डॉलर होता. जून 2022 पर्यंत, क्रेडला 1 बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त निधी मिळाला होता. कुणाल शाह म्हणाले, "इतिहास पाहिला तर, क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरल्याबद्दल आजपर्यंत कोणालाही रिवॉर्ड मिळालेले नाही. ही विसंगती आम्हाला दूर करायची होती." विल्सन कॉलेजमधून फिलॉसॉफीत पदवी घेतलेल्या कुणाल शाह यांनी नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून एमबीए करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु उद्योजक बनण्यासाठी त्यांनी आपलं शिक्षण मधूनच सोडलं.

Web Title: Success Story CRED became a unicorn by making credit card payment rewards see how it became a big company million dollars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.