मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या (जेएफएसएल) शेअरमध्ये बुधवारी जोरदार तेजी दिसून आली. आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी, हा शेअर २.७५ टक्क्यांनी वधारला आणि २९१.६० रुपयांच्या इंट्राडे हायवर जाऊन पोहोचला. याच वेळी, शेअरची क्लोजिंग २.३३ टक्क्यांनी वाढून २९०.४० रुपयांवर झाली. गेल्या एका महिन्यात हा शेअर सुमारे १२ टक्क्यांनी वाधारला आहे. खरे तर, एक्सपर्ट देखील या शेअर वर बुलिश दिसत आहेत. एक्सपर्ट्सनी या शेअरसाठी 350 रुपये एवढी टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. हा शेअर मार्च महिन्यात 198.60 रुपयांवर होता. ही शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी होती. मार्च 2025 पर्यंत या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड समर्थित कंपनीत प्रमोटर्सचा वाटा 47.12 टक्के एवढा होता.
काय म्हणतात एक्सपर्ट्स -
जियोजित फायनान्शियलचे वरिष्ठ उपाध्यक्ष गौरांग शाह यांनी बिझनेस टुडेवरून शेअरसाठी टार्गेट प्राइस दिली आहे. "जियो फायनान्शियलच्या शेअरकडे आम्ही सकारात्मक दृष्टीने बघत आहोत आणि याची लॉन्ग टर्म टार्गेट प्राइस 350 रुपये एवढी आहे," असे त्यांनी म्हटले आहे. सेबी-रजिस्टर्ड एआर रामचंद्रन म्हणाले, जिओ फायनान्शियलच्या शेअरचा पुढचा टप्पा 304 रुपयांवर आहे.
म्युच्युअल फंड उद्योगासाठी मंजुरी -
अलीकडेच, जिओ फायनान्शियलच्या उपकंपनीला म्युच्युअल फंड व्यवसायासाठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडून मान्यता मिळाली आहे. जिओब्लॅकरॉक अॅसेट मॅनेजमेंट ही जिओ फायनान्स सर्व्हिसेस लिमिटेड आणि ब्लॅकरॉक कंपनीची ५०:५० अशी जॉइंट व्हेंचर आहे. म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मिळविण्यासाठी जिओ फायनान्शियल आणि ब्लॅकरॉक फायनान्शियल मॅनेजमेंट इंक. ने १९ ऑक्टोबर २०२३ रोजी सेबीकडे कागदपत्रे सादर केली होती. जिओ फायनान्शियल आणि ब्लॅकरॉकने या युनिटमध्ये ८२.५ कोटी रुपयांची प्रारंभिक गुंतवणूक देखील केली आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)