Stock Markets Today: देशांतर्गत शेअर बाजाराची गुरुवारी व्यवहाराच्या सुरुवातीला चांगली तेजी पाहायला मिळाली. बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स २७० अंकांनी वधारून ८२,५४५ वर व्यवहार करत होता, तर निफ्टी ७५ अंकांनी वाढून २५,५५८ च्या आसपास होता. बँक निफ्टीमध्येही सुमारे १५० अंकांची तेजी दिसून आली आणि हा निर्देशांक ६१,१९१ वर पोहोचला होता. विशेषतः आयटी निर्देशांकात झालेल्या जोरदार खरेदीमुळे तो १ टक्क्यानं वधारला, तसंच इतर क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही वाढ दिसून आली.
सुरुवातीच्या तेजीनंतर बाजारात चढ-उतार
बाजारानं सुरुवातीला घेतलेली झेप काही काळानं कमी होताना दिसली. सकाळी ९.२७ च्या सुमारास सेन्सेक्स ३३ अंकांच्या किरकोळ वाढीसह ८२,३०९ वर आणि निफ्टी ३१ अंकांच्या वाढीसह २५,५०० च्या आसपास व्यवहार करत होता. बँक निफ्टी ६५ अंकांनी वाढून ६१,०९६ वर होता, तर इंडिया व्हीआयएक्स (India VIX) १ टक्क्यानं घसरला होता. यादरम्यान रियल्टी, मीडिया, एफएमसीजी, कन्झ्युमर ड्युरेबल आणि खासगी बँक निर्देशांकात घसरण झाली, तर आयटीसह पीएसयू बँक निर्देशांक, हेल्थकेअर, फार्मा आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदीचा जोर दिसून आला.
पती-पत्नीनं केली कमाल; छोट्या सुरुवातीतून उभा केला ३३३ कोटींचा व्यवसाय, पाहा काय केलं असं?
जागतिक संकेत आणि गुंतवणूकदारांचा कल
आज बाजारातील व्यवहारांवर जागतिक संकेत, संस्थागत गुंतवणूकदारांची मजबूत खरेदी आणि कमोडिटी बाजारातील हालचालींचा प्रभाव दिसून आला. मागील सत्रात विदेशी संस्थागत गुंतवणूकदार (FIIs) आणि देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदार (DIIs) या दोघांचाही बाजाराला मोठा पाठिंबा मिळाला. तसंच अमेरिकन बाजारातील तेजीमुळे गुंतवणुकीचं वातावरण सकारात्मक राहिलं. आज गुंतवणूकदारांचं लक्ष जागतिक घडामोडींसह ओएफएस, आयपीओ आणि मोठ्या व्यवहारांवर असणार आहे.
संस्थागत गुंतवणूकदारांची जोरदार खरेदी
संस्थागत गुंतवणूकदारांनी बाजारात मोठा विश्वास दाखवल्याने निर्देशांकांना आधार मिळाला आहे. परकीय गुंतवणूकदारांनी (FIIs) कॅश मार्केट, इंडेक्स फ्युचर्स आणि स्टॉक फ्युचर्स मिळून एकूण ४,६१८ कोटी रुपयांची खरेदी केली. याचसोबत देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी ५,११९ कोटी रुपये बाजारात गुंतवले. या सातत्यपूर्ण खरेदीमुळे बाजाराची खालची पातळी मजबूत असल्याचे दिसून येत आहे.
