Lokmat Money > बिझनेस न्यूज > सलग सातव्या दिवशी रॉकेट बनला हा शेअर; 27% नं वधारला, ₹161 वर जाऊ शकतो भाव

सलग सातव्या दिवशी रॉकेट बनला हा शेअर; 27% नं वधारला, ₹161 वर जाऊ शकतो भाव

या शेअरमध्ये सलग सातव्या दिवशी तेजी दिसून आली आहे. या कालावधीत कंपनीचा शेअर २७ टक्क्यांनी वधारला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 22:44 IST2025-02-04T22:43:19+5:302025-02-04T22:44:57+5:30

या शेअरमध्ये सलग सातव्या दिवशी तेजी दिसून आली आहे. या कालावधीत कंपनीचा शेअर २७ टक्क्यांनी वधारला आहे.

Stock market vishal mega mart share jumped for seventh straight session target price 161 rupee | सलग सातव्या दिवशी रॉकेट बनला हा शेअर; 27% नं वधारला, ₹161 वर जाऊ शकतो भाव

सलग सातव्या दिवशी रॉकेट बनला हा शेअर; 27% नं वधारला, ₹161 वर जाऊ शकतो भाव

विशाल मेगा मार्टचा शेअर मंगळवारी ८ टक्क्यांहून अधिकने वधारून १२५.४५ रुपयांवर बंद झाला. हा शेअर मंगळवारच्या व्यवहारादरम्यान १२६.८५ रुपयांवर पोहोचला आणि ५२ आठवड्यांचा आपला नवा उच्चांक नोंदवला. महत्वाचे म्हणजे, या शेअरमध्ये सलग सातव्या दिवशी तेजी दिसून आली आहे. या कालावधीत कंपनीचा शेअर २७ टक्क्यांनी वधारला आहे. विशाल मेगा मार्टचे मार्केट कॅप ५६,५०० कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांक ९६.७१ रुपये आहे.

IPO प्राइसच्या तुलनेत 60% ने वधारला शेअर - 
विशाल मेगा मार्ट (Vishal Mega Mart) चा शेअर आपल्या IPO प्राइसच्या तुलनेत 60 पर्सेंटहून अधिकने वधारला आहे. आयपीओमध्ये कंपनीच्या सेअरची किंमत 78 रुपये होती. हा शेअर गेल्या 18 डिसेंबर 2024 रोजी BSE मध्ये 110 रुपयांवर लिस्ट जाला होता. महत्वाचे म्हजणे, विशाल मेगा मार्टचा आयपीओ एकूण 28.75 पट सब्सक्राइब झाला होता.

मॉर्गन स्टॅनलीनं दिले 161 रुपये टार्गेट -
ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने काही दिवासांपूर्वीच विशाल मेगा मार्टचे कव्हरेज सुरू केले आहे. ब्रोकरेज हाऊसने कंपनीच्या शेअरला ओव्हरवेट रेटिंग दिली असून १६१ रुपयांची टार्गेट प्राइसही दिली आहे. ब्रोकरेज हाऊस एलारा सिक्योरिटीजने विशाल मेगा मार्टच्या शेअरला बाय रेटिंग दिले आहे. 

एलारा सिक्योरिटीजने कंपनीच्या शेअरला 140 रुपयांची टार्गेट प्राइस दिली आहे. विशाल मेगा मार्टचे कव्हरेज करणाऱ्या 5 विश्लेषकांपैकी 4 जणांनी कंपनीच्या शेअर्सना बाय रेटिंग दिले आहे. तर एका विश्लेषकाने कंपनीच्या शेअरला होल्ड रेटिंग दिले आहे. सीएनबीसी-टीवी 18 ने एका वृत्तात यासंदर्भात माहिती दिली आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

Web Title: Stock market vishal mega mart share jumped for seventh straight session target price 161 rupee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.