Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारतीय शेअर बाजाराची वेगवान कामगिरी, जर्मनी, जपान, अमेरिकेला टाकले मागे

भारतीय शेअर बाजाराची वेगवान कामगिरी, जर्मनी, जपान, अमेरिकेला टाकले मागे

Stock Market Latest News: एकूण बाजार भांडवलामध्ये मागील सहा व्यापारी सत्रांमध्ये एकूण २७.१० लाख कोटींची वाढ झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 18:17 IST2025-03-25T18:16:37+5:302025-03-25T18:17:57+5:30

Stock Market Latest News: एकूण बाजार भांडवलामध्ये मागील सहा व्यापारी सत्रांमध्ये एकूण २७.१० लाख कोटींची वाढ झाली आहे.

Stock market updates Indian stock market's rapid performance | भारतीय शेअर बाजाराची वेगवान कामगिरी, जर्मनी, जपान, अमेरिकेला टाकले मागे

भारतीय शेअर बाजाराची वेगवान कामगिरी, जर्मनी, जपान, अमेरिकेला टाकले मागे

नवी दिल्ली: सलग पाच महिन्यांच्या घसरणीनंतर मार्चमध्ये भारतीय शेअर बाजाराने जोरदार पुनरागमन केल्याचे दिसत आहे. भारतीय बाजाराचे एकूण बाजार भांडवल (मार्केट कॅप) ९.४ टक्के वाढून ४.८ लाख कोटी डॉलर्सवर पोहोचले आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

ही वाढ गेल्या चार वर्षातील सर्वांत मोठी मासिक वाढ आहे. या वाढीमुळे भारतीय बाजार जगातील टॉप १० इक्विटी बाजारांमध्ये सर्वात उत्कृष्ट कामगिरी करणारा ठरला आहे.

हेही वाचा >> 'या' ५ कारणांमुळे शेअर बाजार रॉकेट! ७ दिवसात वारं फिरलं

एकूण बाजार भांडवलामध्ये मागील सहा व्यापारी सत्रांमध्ये एकूण २७.१० लाख कोटींची वाढ झाली आहे. त्यामुळे या कालखंडात गुंतवणूकराकांचा आत्मविश्वास चांगलाच वाढल्याचे दिसून आले आहे.

तेजीमागे कारणे कोणती?

व्याज दर कपातीच्या अपेक्षा : महागाईची आकडेवारी आरबीआयच्या ४ टक्के इतक्या उद्दिष्टापेक्षा कमी राहिल्याने एप्रिलमधील चलनविषयक धोरण बैठकीत व्याज दर कमी होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत.

अमेरिकन फेडचा मवाळ दृष्टिकोन : २०२५ मध्ये अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून दोन वेळा दर कपातीचे संकेत मिळाले आहेत.

मजबूत तिमाही निकालांची अपेक्षा : गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे तिमाहीचे निकाल चांगले असण्याची अपेक्षा आहे.

मार्चमध्ये किती वाढ?

भारत ९.४ टक्के वाढ, जर्मनी ५.६४ टक्के वाढ, जपान ४.९ टक्के वाढ, हाँगकाँग ४ टक्के वाढ, फ्रान्स २.७ टक्के वाढ, चीन २.२ टक्के वाढ, यूके २ टक्के वाढ, कॅनडा ०.४४ टक्के वाढ, अमेरिका -३.७ टक्के घसरण, सौदी अरेबिया -४.४ टक्के घसरण.

Web Title: Stock market updates Indian stock market's rapid performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.