Lokmat Money > बिझनेस न्यूज > Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी

Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी

Stock Market Today:  शेअर बाजारात आज मे सीरिजचा पहिला दिवस असून बाजारात आ तेजी दिसून येत आहे. सेन्सेक्स २५० अंकांनी वधारून ८०,००० च्या वर व्यवहार करत होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 10:03 IST2025-04-25T10:03:53+5:302025-04-25T10:03:53+5:30

Stock Market Today:  शेअर बाजारात आज मे सीरिजचा पहिला दिवस असून बाजारात आ तेजी दिसून येत आहे. सेन्सेक्स २५० अंकांनी वधारून ८०,००० च्या वर व्यवहार करत होता.

Stock market up on the first day of May series Sensex rises by 250 points realty metal gains | Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी

Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी

Stock Market Today:  शेअर बाजारात आज मे सीरिजचा पहिला दिवस असून बाजारात आ तेजी दिसून येत आहे. सेन्सेक्स २५० अंकांनी वधारून ८०,००० च्या वर व्यवहार करत होता. निफ्टी १०० अंकांनी वधारून २४,३४७ च्या आसपास होता. बँक निफ्टीमध्ये आज किंचित घसरण दिसून आली. निर्देशांक २९ अंकांनी घसरून ५५,१६९ वर व्यवहार करत होता. रियल्टी, फार्मा आणि मेटल निर्देशांकात सर्वाधिक वाढ नोंदविण्यात आली. वाहन निर्देशांकही वधारला होता. एसबीआय लाइफ, एचडीएफसी लाइफ, टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक आणि विप्रोमध्ये सर्वाधिक वाढ झाली. हे निफ्टीचे सर्वाधिक तेजीत होते. अॅक्सिस बँक, नेस्ले, बीईएल, पॉवर ग्रिड, अदानी पोर्ट्स, एसबीआय यांचे समभाग निफ्टीत सर्वाधिक घसरले.

एप्रिल सीरिजमध्ये बाजाराने काही प्रमाणात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे. आता जागतिक बाजारपेठेतूनही चांगले ट्रिगर्स येत आहेत. जर आपण एफआयआयवर नजर टाकली तर डिसेंबर २०२३ नंतर पहिल्यांदाच, एफआयआयनी सलग ७ दिवस रोखीने खरेदी केली. काल मंथली एक्सपायरीनंतर, सुमारे १२२०० कोटींची निव्वळ खरेदी झाली ज्यामध्ये ८२५० कोटी रोख रक्कम होती. आज गिफ्ट निफ्टी सुमारे ११३ अंकांनी वधारला. डाऊ फ्युचर्स फ्लॅट होते आणि निक्केई ४५० अंकांनी वर होता.

घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

काल टेक शेअर्सच्या जोरावर अमेरिकन बाजार सलग तिसऱ्या दिवशी तेजीत होता. डाऊ जवळपास ५०० अंकांनी वधारला, तर नॅसडॅक ४५० अंकांनी वधारून दिवसाच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला. चीननं शुल्काबाबत कोणतीही वाटाघाटी किंवा करार करण्याचा अमेरिकेचा दावा फेटाळून लावला आहे आणि आपण वाटाघाटींसाठी तयार आहोत, परंतु अमेरिकेनं आधी शुल्क पूर्णपणे काढून टाकावं, असं त्यांनी म्हटलंय.

 

Web Title: Stock market up on the first day of May series Sensex rises by 250 points realty metal gains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.