Lokmat Money > बिझनेस न्यूज > याला म्हणतात बंपर परतावा...! ₹5 वरून ₹1070 वर पोहोचला हा शेअर, गुंतवणूकदारांना करतोय मालामाल

याला म्हणतात बंपर परतावा...! ₹5 वरून ₹1070 वर पोहोचला हा शेअर, गुंतवणूकदारांना करतोय मालामाल

एप्रिल २०२५ मध्ये शेअरची किंमत ७६८.१० रुपये होती, हा शेअरच्य ५२ आठवड्यांचा नीचांक आहे. तर शेअरच्या ५२ आठवड्यांचा उच्चांक १२५२.८५ रुपये एवढा आहे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 01:53 IST2025-07-13T01:52:39+5:302025-07-13T01:53:13+5:30

एप्रिल २०२५ मध्ये शेअरची किंमत ७६८.१० रुपये होती, हा शेअरच्य ५२ आठवड्यांचा नीचांक आहे. तर शेअरच्या ५२ आठवड्यांचा उच्चांक १२५२.८५ रुपये एवढा आहे...

Stock market uno minda share rs 5 turn rs1072 know decline price and other details | याला म्हणतात बंपर परतावा...! ₹5 वरून ₹1070 वर पोहोचला हा शेअर, गुंतवणूकदारांना करतोय मालामाल

याला म्हणतात बंपर परतावा...! ₹5 वरून ₹1070 वर पोहोचला हा शेअर, गुंतवणूकदारांना करतोय मालामाल

शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. अशीच एक कंपनी म्हणजे, यूएनओ मिंडा. या कंपनीच्या शेअरने साधारणपणे १२ वर्षांतच आपल्या गुंतवणूकदारांना १७,७००% एवढा बंपर परतावा दिला आहे. ऑगस्ट २०१३ मध्ये युनो मिंडाच्या शेअरची किंमत सुमारे ५ रुपये होती. गेल्या शुक्रवारी हा शेअर १०७१ रुपयांवर बंद झाला. या काळात, या शेअरने बोनसशिवाय १:१ आणि २:१ या प्रमाणात व्यवहार केला आहे.

शेअरची किंमत - 
आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी अर्थात शुक्रवारी, शेअरची किंमत १०९७.९५ रुपयांवर पोहोचली होती. हा शेअर २.३८% ने घसरून १०७१.८० रुपयांवर क्लोज झाला. एप्रिल २०२५ मध्ये शेअरची किंमत ७६८.१० रुपये होती, हा शेअरच्य ५२ आठवड्यांचा नीचांक आहे. तर शेअरच्या ५२ आठवड्यांचा उच्चांक १२५२.८५ रुपये एवढा आहे. 

कंपनीचे तिमाही निकाल -
युनो मिंडाने मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. वार्षिक आधारावर कंपनीचा निव्वळ नफा ७.५% ने घसरून ₹२६६ कोटीवर आला आहे. जो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत ₹२८७.९ कोटी एवढा होता. मात्र, महसुलाचा विचार करता यात वार्षिक आधारावर 19.4% ची वृदी झाली आहे. तो गेल्या वर्षी याच कालावधीच्या ₹3794 कोटींच्या तुलनेत ₹4528 कोटीवर पोहोचला आहे. 

याशिवाय, कंपनीचा एबिटा (व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफीपूर्वीचे उत्पन्न) वार्षिक आधारावर ११ टक्क्यांनी वाढून ₹५२६.८ कोटी झाले आहे. तर गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत ते ₹४७४ कोटी एवढे होते. 

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

Web Title: Stock market uno minda share rs 5 turn rs1072 know decline price and other details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.