Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > बाजारात 'युद्ध'प्रलय; रुपयाही नीचांकावर; मार्चमध्ये युद्धामुळे ५२ लाख कोटींचे नुकसान

बाजारात 'युद्ध'प्रलय; रुपयाही नीचांकावर; मार्चमध्ये युद्धामुळे ५२ लाख कोटींचे नुकसान

महागाई : रुपयाची १४ वर्षांतील सर्वात मोठी घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 06:03 IST2026-03-31T06:02:01+5:302026-03-31T06:03:36+5:30

महागाई : रुपयाची १४ वर्षांतील सर्वात मोठी घसरण

Stock Market Turmoil Iran Israel War Wipes Out 52 Lakh Crore in One Month | बाजारात 'युद्ध'प्रलय; रुपयाही नीचांकावर; मार्चमध्ये युद्धामुळे ५२ लाख कोटींचे नुकसान

बाजारात 'युद्ध'प्रलय; रुपयाही नीचांकावर; मार्चमध्ये युद्धामुळे ५२ लाख कोटींचे नुकसान

मुंबई: अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्ध सुरू झाल्यापासून मार्च महिन्यात शेअर बाजारातही युद्धाचा प्रलय आला असून, एकाच महिन्यात गुंतवणूकदारांचे ५२ लाख कोटींचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे रुपयाही महानीचांकी पातळीवर पोहोचला आहे. एका डॉलरसाठी ९४.७० रुपये मोजावे लागणार असल्याने येत्या काळात देशात महागाईचा आगडोंब होऊ शकतो.

सोमवारी सेन्सेक्स १,६३५ अंकांनी कोसळून ७१,९४७.५५ वर बंद झाला. बाजारातील घसरणीचा मोठा परिणाम जागतिक पातळीवर दिसू लागला असून, जगातील एकूण बाजारमूल्यातील भारताचा हिस्सा चार वर्षात प्रथमच ३ टक्क्यांच्या खाली घसरला. ३० मार्च २०२६ रोजी हा हिस्सा २.९८ टक्क्यांवर आला असून, २०२४ मधील शिखर पातळीवरून मोठी घसरण नोंदवली गेली आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओ लालेलाल झाले आहेत.

घसरणीमागील प्रमुख कारणे

 पश्चिम आशियातील युद्धाचा भडका वाढला. कच्च्या तेलाचे दर ११५ डॉलर प्रतिबॅरलवर, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणावर विक्री जागतिक बाजारातील नकारात्मक संकेत.

डॉलरसमोर रुपयाचे लोटांगण 

इराण युद्धामुळे, रुपयाने सोमवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत प्रथमच २५ चा टप्पा ओलांडला. व्यवहारादरम्यान तो घसरून ९५.२२च्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. मात्र, नंतर त्यात किंचित सुधारणा झाली आणि व्यवहाराच्या अखेरीस तो ९४.७८ वर बंद झाला. रुपयात १४ वर्षांतील सर्वात मोठी घसरण झाली आहे.

चांदीत ७ हजार रुपयांची वाढ होऊन दर २.३७ लाख रुपये प्रतिकिलोवर पोहोचले, सोन्याचा भाव ३,७०० रुपयांनी वाढत १.५१ लाख रुपये प्रति १० ग्रॅमवर गेला.
 

Web Title : बाजार में हाहाकार: युद्ध का असर, रुपया लुढ़का, मार्च में भारी नुकसान

Web Summary : युद्ध की आशंकाओं से मार्च में बाजार में उथल-पुथल मची, निवेशकों का धन स्वाहा हो गया। रुपया डॉलर के मुकाबले रिकॉर्ड निचले स्तर पर, जिससे मुद्रास्फीति की चिंता बढ़ गई। शेयर बाजार में गिरावट और बढ़ती सोने, चांदी की कीमतों ने आर्थिक चिंताओं को बढ़ाया।

Web Title : Market Carnage: War Impact, Rupee Plummets, Massive Losses in March

Web Summary : War fears triggered market turmoil in March, wiping out investor wealth. The rupee hit a record low against the dollar, fueling inflation concerns. Stock market dips and rising gold, silver prices added to economic worries.