Stock Market Crash Today: जागतिक संकेत आणि देशांतर्गत बातम्यांमुळे, शुक्रवारी भारतीय शेअर बाजारांची सुरुवात कमकुवत झाली. सेन्सेक्स ४३० अंकांनी घसरला. निफ्टी १४० अंकांनी घसरून २५,४०० च्या खाली आला. बँक निफ्टी देखील सुमारे २०० अंकांनी घसरला. निफ्टीवरील सर्व निर्देशांक घसरले. परंतु आयटी, कंझ्युमर ड्युरेबल्स, रिअल्टी, ऑटो, पीएसयू बँक, प्रायव्हेट बँक निर्देशांकांमध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली.
निफ्टीवर, फक्त मॅक्स हेल्थकेअर, आयसीआयसीआय बँक, सन फार्मा, आयटीसी, एचडीएफसी लाइफ, एसबीआय लाइफ, पॉवर ग्रिड ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत होते. भारती एअरटेल, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, टीसीएस, विप्रो, जिओ फायनान्शियल्स या कंपन्यांच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली.
कामकाजाच्या सुरुवातीला सेन्सेक्स १६१ अंकांनी घसरून ८३,१५० वर उघडला. निफ्टी ७६ अंकांनी घसरून २५,४३३ वर उघडला. बँक निफ्टी १६३ अंकांनी घसरून ५७,३९१ वर उघडला. चलन बाजारात, रुपया ५ पैशांनी घसरून ८८.६६/डॉलर्सवर उघडला. सकाळी निफ्टी सुमारे १३० अंकांनी घसरला होता. अमेरिकन बाजारातील तीव्र घसरण, एफआयआयकडून विक्री सुरू राहणं आणि कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी घसरण यासारख्या घटकांमुळे बाजारातील हालचाल निश्चित होईल. गुंतवणूकदार आज अनेक प्रमुख कंपन्यांच्या तिमाही निकालांवरही लक्ष ठेवतील.
अमेरिकन बाजारांमध्ये मोठी घसरण
मंगळवारी वॉल स्ट्रीटमध्ये मोठी घसरण झाली, कारण एआय स्टॉक्समध्ये मोठी विक्री झाली. डाउ जोन्स ३९८ अंकांनी घसरला, नॅस्डॅक ४४५ अंकांनी घसरला आणि एस अँड पी ५०० देखील रेड झोनमध्ये बंद झाला. डाउ फ्युचर्स देखील मध्येही घसरण दिसून आली.
