Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टीमध्ये ७० अंकांची तेजी; IT आणि मेटल शेअर्स सुस्साट

Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टीमध्ये ७० अंकांची तेजी; IT आणि मेटल शेअर्स सुस्साट

Share Market Today: मंगळवारी निफ्टीच्या वीकली एक्स्पायरी दरम्यान शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. सेन्सेक्स सुमारे १५० अंकांनी वाढून व्यवहार करत होता.

By जयदीप दाभोळकर | Updated: October 14, 2025 10:01 IST2025-10-14T10:01:40+5:302025-10-14T10:01:40+5:30

Share Market Today: मंगळवारी निफ्टीच्या वीकली एक्स्पायरी दरम्यान शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. सेन्सेक्स सुमारे १५० अंकांनी वाढून व्यवहार करत होता.

Stock market today starts with a bullish start Nifty up 70 points IT and metal shares do well | Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टीमध्ये ७० अंकांची तेजी; IT आणि मेटल शेअर्स सुस्साट

Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टीमध्ये ७० अंकांची तेजी; IT आणि मेटल शेअर्स सुस्साट

Share Market Today: मंगळवारी निफ्टीच्या वीकली एक्स्पायरी दरम्यान शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. सेन्सेक्स सुमारे १५० अंकांनी वाढून व्यवहार करत होता. तर, निफ्टीही ७० अंकांनी वाढला होता. बँक निफ्टी सुरुवातीला सुस्त होता, पण नंतर त्यात तेजी आली. ब्रॉडर मार्केटमध्येही खरेदी दिसून येत होती. आयटी आणि मेटल शेअर्समध्ये जबरदस्त तेजी दिसली. एचसीएल टेक निफ्टी ५० चा टॉप गेनर होता.

मागील क्लोजिंगच्या तुलनेत सेन्सेक्स ७७ अंकांनी वर ८२,४०४ वर उघडला. निफ्टी कोणत्याही बदलाशिवाय २५,२२७ वर उघडला. बँक निफ्टी २७ अंकांनी खाली ५६,५९८ वर उघडला आणि चलन बाजारात रुपया ७ पैशांनी कमजोर होऊन ८८.७४/डॉलर्स वर उघडला.

१ नोव्हेंबरपासून करू शकणार २३९० रुपयांत हवाई प्रवास, या दिग्गज कंपनीनं केली मोठी घोषणा

आज जागतिक आणि देशांतर्गत बाजारात अनेक महत्त्वपूर्ण संकेत दिसून आले. एका बाजूला अमेरिकेच्या बाजारात जबरदस्त रिकव्हरी नोंदवली गेली आहे, तर दुसऱ्या बाजूला सोने-चांदीने नवीन विक्रमी उच्चांक गाठले आहेत. त्याच वेळी, देशांतर्गत स्तरावर महागाई दरात मोठी घसरण, एलजी इलेक्ट्रॉनिक्सची लिस्टिंग आणि अनेक मोठ्या कंपन्यांचे निकाल आज बाजाराची दिशा ठरवतील.

अमेरिकेच्या बाजारात शानदार रिकव्हरी

चीनसोबतचा व्यापार तणाव कमी होण्याची अपेक्षा आणि व्याज दर कपातीच्या अटकळींदरम्यान, सोमवारी अमेरिकेच्या बाजारात जोरदार तेजी दिसून आली. डॉव जोन्स ६०० अंकांच्या उसळीसह बंद झाला. नॅसडॅकनं ५०० अंकांची झेप घेतली आणि दिवसाच्या उच्चांकावर क्लोज झाला. एसअँडपी ५०० (S&P 500) मध्ये २७ मे नंतरची सर्वात मोठी १०० अंकांची तेजी नोंदवली गेली. या तेजीमागील प्रमुख कारणे होती ती म्हणजे व्याज दर कपातीची वाढती अपेक्षा, अमेरिका-चीन संबंधांमधील नरमाई आणि मजबूत टेक स्टॉक्सची खरेदी.

आशियाई बाजारांचा संमिश्र कल

जागतिक संकेतांदरम्यान आज आशियाई बाजारात हालचाल मर्यादित आहे. गिफ्ट निफ्टी २५,३२५ जवळ फ्लॅट व्यवहार करत आहे. डाऊ फ्युचर्समध्ये सुमारे १०० अंकांची तेजी कायम आहे. तर, निक्केई २२५ मध्ये ५०० अंकांची घसरण दिसून येत आहे.

Web Title : शेयर बाजार की मजबूत शुरुआत; निफ्टी ऊपर, आईटी और मेटल में उछाल।

Web Summary : शेयर बाजार की शुरुआत सकारात्मक रही, निफ्टी में तेजी आई। आईटी और मेटल शेयरों में उछाल आया। व्यापार तनाव कम होने की उम्मीदों के बीच अमेरिकी बाजारों में सुधार देखा गया। एशियाई बाजारों में मिश्रित रुझान दिखे। घरेलू कारक बाजार को प्रभावित करेंगे।

Web Title : Stock market opens strong; Nifty up, IT and metal soar.

Web Summary : The stock market began positively with Nifty rising. IT and metal shares surged. US markets saw recovery amid trade tension easing hopes. Asian markets showed mixed trends. Domestic factors like inflation and company results will influence the market.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.