Stock Market : गेल्या २ दिवसांच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारात आज (९ ऑक्टोबर) जोरदार तेजी दिसून आली. कालच्या नफावसुलीला मागे टाकत बाजार पुन्हा एकदा सकारात्मक स्तरावर बंद झाला. आजच्या ट्रेडिंग सत्रात मेटल, फार्मा आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांनी उत्कृष्ट कामगिरी केली. बाजार बंद होताना सेन्सेक्स ३९८ अंकांनी वाढून ८२,१७२.१० या पातळीवर स्थिरावला. तर निफ्टी ५० इंडेक्स १३५ अंकांची शानदार वाढ नोंदवत २५,१८१.८० च्या विक्रमी पातळीवर बंद झाला.
२ लाख कोटींचा नफा; बाजारातील तेजीची कारणे
बाजार तज्ज्ञांच्या मते, देशांतर्गत बाजारासाठी मध्यम आणि दीर्घकालीन दृष्टिकोन चांगला राहण्याची चिन्हे दिसू लागल्यामुळे बाजारात शॉर्ट कव्हरिंग दिसून आली. यामुळे बाजाराने अर्धा टक्क्यांहून अधिकची वाढ नोंदवली.
या तेजीमुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वरील सर्व कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल २ लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. आज सेन्सेक्स पॅकमधील ३० पैकी २३ समभाग तेजीसह बंद झाले, तर केवळ ७ समभागांमध्ये घसरण नोंदवली गेली.
सेक्टोरल परफॉर्मन्स : मेटल, आयटीमध्ये जोरदार खरेदी
आजच्या व्यवहारात जवळपास सर्वच सेक्टर्सनी चांगली कामगिरी केली, मात्र मेटल, फार्मा आणि आयटी सेक्टरचे समभाग सर्वाधिक मजबूत राहिले.
आज टॉप गेनर्समध्ये टाटा स्टील (२.७%), एचसीएल टेक (२.२१%), अल्ट्राटेक सिमेंट (१.५%), बीईएल (१.४७%), सन फार्मा (१.३७%) राहिले तर ॲक्सिस बँक (०.९१%), एचडीएफसी बँक (०.३८%), टायटन (०.४१%), मारुती सुझुकी (०.१७%) हे टॉप लूझर्स होते.
वाचा - कामवाली बाईने खरेदी केला ६० लाखांचा फ्लॅट! फक्त १० लाखांचं घेतलं कर्ज; भलेभले गुंतवणूकदारही अचंबित
तेजीचं कारण काय?
- सकारात्मक भावना: "निफ्टीने कालची नकारात्मकता मागे टाकून आज सकारात्मकता दर्शवली आहे. शॉर्ट टर्ममधील बाजाराची भावना अजूनही सकारात्मक बनलेली आहे."
- रेझिस्टन्स : निफ्टी इंडेक्स आज २५,२५० या महत्त्वाच्या रेझिस्टन्स पातळीला (प्रतिरोध) तोडण्यात अपयशी ठरला.
- पुढील लक्ष्य: जर निफ्टीने २५,२५० ची पातळी यशस्वीरित्या ओलांडली, तर हा इंडेक्स २५,६०० पर्यंतचा पल्ला गाठू शकतो.
- सपोर्ट : खालच्या स्तरावर २५,००० ची पातळी एक महत्त्वपूर्ण सपोर्ट लेव्हल म्हणून काम करेल.
- डेली टाइमफ्रेमवर प्रमुख मूव्हिंग एव्हरेजच्या वर इंडेक्स टिकून असल्याने, पुढील काही सत्रांमध्ये तेजी कायम राहण्याची शक्यता आहे.