Lokmat Money > बिझनेस न्यूज > Stock Market Today: ३९३ अंकांच्या तेजीसह Sensex उघडला; ऑटो आणि आयटी क्षेत्रात जोरदार खरेदी

Stock Market Today: ३९३ अंकांच्या तेजीसह Sensex उघडला; ऑटो आणि आयटी क्षेत्रात जोरदार खरेदी

Stock Market Today: शेअर बाजारात आज तेजीसह कामकाजाची सुरुवात पाहायला मिळाली. सेन्सेक्स ३९३ अंकांनी वधारून ८२,४४८ वर उघडला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 09:59 IST2025-06-25T09:59:21+5:302025-06-25T09:59:21+5:30

Stock Market Today: शेअर बाजारात आज तेजीसह कामकाजाची सुरुवात पाहायला मिळाली. सेन्सेक्स ३९३ अंकांनी वधारून ८२,४४८ वर उघडला.

Stock Market Today Sensex opens with a gain of 393 points Strong buying in auto and IT sectors | Stock Market Today: ३९३ अंकांच्या तेजीसह Sensex उघडला; ऑटो आणि आयटी क्षेत्रात जोरदार खरेदी

Stock Market Today: ३९३ अंकांच्या तेजीसह Sensex उघडला; ऑटो आणि आयटी क्षेत्रात जोरदार खरेदी

Stock Market Today: शेअर बाजारात आज तेजीसह कामकाजाची सुरुवात पाहायला मिळाली. सेन्सेक्स ३९३ अंकांनी वधारून ८२,४४८ वर उघडला. निफ्टी १०६ अंकांनी वधारून २५,१५० वर पोहोचला. बँक निफ्टी १०३ अंकांनी वधारून ५६,५६४ वर पोहोचला. तर दुसरीकडे रुपया ८५.९८ च्या तुलनेत ८६.०१/डॉलरवर उघडला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये आज सुरुवातीच्या व्यवहारात तेजी दिसून आली. सेक्टोरल इंडेक्सचा विचार केला तर आज सर्वच निर्देशांक ग्रीन मार्कमध्ये ट्रेड करत आहेत. निफ्टी ऑटो, फार्मा, रियल्टी, मेटल आणि आयटमध्ये तेजी दिसून आली.

कामकाजादरम्यान टायटन, हिंदुस्तान युनिलिव्हर, रिलायन्स, एचसीएलटेक आणि अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर दुसरीकडे बीईएल, आयसीआयसीआय बँक, कोटक बँकेच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात

इराण आणि इस्रायल यांच्यातील शस्त्रसंधीमुळे जागतिक बाजारपेठेत समाधानाचं वातावरण निर्माण झालंय आहे. या शांततेमुळे पुरवठ्याची चिंता कमी झाली आणि काल ब्रेंट क्रूडचा भाव ६ टक्क्यांनी घसरून ६६ डॉलरच्या खाली गेल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली. सध्या तो ६७ डॉलरच्या जवळपास ट्रेड करत आहे. कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाल्यानं महागाईची चिंताही कमी होताना दिसत आहे आणि जागतिक गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा निर्माण झालाय.

अमेरिकेच्या शेअर बाजारात तेजी

या सकारात्मक वातावरणाचा परिणाम अमेरिकेच्या शेअर बाजारावरही स्पष्टपणे दिसून आला. डाऊ जोन्स ५०० अंकांच्या वाढीसह चार महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला, तर नॅसडॅक २८० अंकांनी वधारला. एस अँड पी ५०० निर्देशांकातही लक्षणीय वाढ दिसून आली. आशियाई बाजारातही संमिश्र वातावरण होतं. गिफ्ट निफ्टी ७५ अंकांच्या वाढीसह २५,१५० च्या जवळ व्यवहार करत होता, तर निक्केई आणि डाऊ फ्युचर्स जवळजवळ फ्लॅट होते.

Web Title: Stock Market Today Sensex opens with a gain of 393 points Strong buying in auto and IT sectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.