Stock Market Today: शेअर बाजारात आज पुन्हा तेजी पाहायला मिळाली. बाजार उघडल्यानंतर लगेचच निफ्टीनं २५,००० चा जादुई आकडा गाठला. सेन्सेक्स २०७ अंकांनी वधारून ८१,९२८ वर खुला झाला. निफ्टी ६६ अंकांनी वधारून २४,९१९ वर पोहोचला. बँक निफ्टी १३६ अंकांनी वधारून ५५,५३४ वर पोहोचला. रुपया ८५.२१ च्या तुलनेत ८५.०५/डॉलरवर उघडला.
सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचं झालं तर निफ्टी रियल्टी इंडेक्स वगळता सर्वच सेक्टर निर्देशांक ग्रीन झोनमध्ये ट्रेड करताना दिसत आहेत. मेटल आणि फार्मा क्षेत्रात सर्वाधिक वेगानं वाढ दिसून येतेय. कामकाजादरम्यान, महिंद्रा, पॉवरग्रिड, टेक महिंद्रा, एनटीपीसी आणि टाटा मोटर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली. तर दुसरीकडे इटर्नलच्या शेअरमध्ये घसरण झाली.
अनेकांना माहीत नाही घरबसल्या कमाईचा हा जुगाड, पत्नीच्या मदतीनं वर्षाला ₹१,११,००० इन्कम पक्की
यामुळे तेजी
जपानला मागे टाकत भारताची अर्थव्यवस्था जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. भारताचा जीडीपी आता ४.१८ ट्रिलियन डॉलरवर पोहोचलाय, जो देशाची आर्थिक ताकद आणि विकासाचा वेग दर्शवतो. देशांतर्गत मागणी, भक्कम निर्यात आणि सरकारची धोरणं हे या वेगवान वाढीचं मुख्य कारण आहे.
रिझर्व्ह बँकेनं २०२४-२५ या आर्थिक वर्षात सरकारला २.६९ लाख कोटी रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत २७ टक्क्यांनी अधिक आहे. या रकमेमुळे सरकारची वित्तीय तूट कमी होण्यास मदत होईल आणि देशाचे वित्तीय आरोग्य मजबूत होईल. भारताच्या अर्थव्यवस्थेला हवामानाचा तिसरा मोठा आधार मिळालाय. यंदा मान्सून केरळमध्ये १६ वर्षांत पहिल्यांदाच आठ दिवस आधीच दाखल झालाय. यामुळे कृषी उत्पादनात सुधारणा होईल, ज्यामुळे ग्रामीण उत्पन्न आणि वापर वाढेल अशी अपेक्षा आहे.