Lokmat Money > बिझनेस न्यूज > Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?

Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?

Stock Market Today: अमेरिकेच्या शुल्काचा परिणाम आज भारतीय बाजारावरही दिसून आला आहे. ट्रम्प यांची भारताबाबतची सकारात्मक भूमिका असल्यानं बाजार कोणत्याही मोठ्या घसरणीपासून सुरक्षित आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 10:03 IST2025-07-09T10:03:50+5:302025-07-09T10:03:50+5:30

Stock Market Today: अमेरिकेच्या शुल्काचा परिणाम आज भारतीय बाजारावरही दिसून आला आहे. ट्रम्प यांची भारताबाबतची सकारात्मक भूमिका असल्यानं बाजार कोणत्याही मोठ्या घसरणीपासून सुरक्षित आहे.

Stock Market Today Sensex opens down 76 points 3 sectors up why is the market volatile | Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?

Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?

Stock Market Today: अमेरिकेच्या शुल्काचा परिणाम आज भारतीय बाजारावरही दिसून आला आहे. ट्रम्प यांची भारताबाबतची सकारात्मक भूमिका असल्यानं बाजार कोणत्याही मोठ्या घसरणीपासून सुरक्षित आहे. त्यामुळेच सेन्सेक्स ८७ अंकांनी घसरून ८३,६२५ वर उघडला. निफ्टी ८ अंकांनी घसरून २५,५१४ वर उघडला. बँक निफ्टी ५७ अंकांनी घसरून ५७,१९९ वर उघडला. रुपया २१ पैशांनी घसरून ८५.९० वर खुला झाला. सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचं झाले तर फार्मा, एफएमसीजी आणि मीडिया सेक्टरमध्ये आज तेजी दिसून आली आहे. हे सर्व जवळपास अर्धा टक्का वाढीसह व्यवहार करत आहेत. त्याचबरोबर आयटी, मेटल आणि बँकिंग क्षेत्रात आज घसरण पाहायला मिळाली.

आज कामकाजादरम्यान हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, मारुती, बजाज फायनान्स आणि इटर्नलच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर कोटक बँक, एचसीएल टेक, टाटा स्टील, एल अँड टी आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली.

वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे

पुन्हा टॅरिफ बॉम्ब

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफ बॉम्ब टाकला आहे, ज्यामुळे जागतिक बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी तांब्यावर ५० टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. या बातमीनंतर, इंट्राडे ट्रेडिंग दरम्यान अमेरिकेत तांब्याच्या किमतीत १७ टक्क्यांनी वाढ झाली आणि ती विक्रमी उच्चांकावर पोहोचली. केवळ मेटल सेक्टरच नाही तर ट्रम्प यांनी फार्मा क्षेत्रालाही मोठा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटलंय की ते लवकरच फार्मा उत्पादनांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लादण्याचा निर्णय घेऊ शकतात, ज्याची घोषणा जुलैच्या अखेरीस होऊ शकते. यामुळे औषध कंपन्या आणि अमेरिकन आरोग्यसेवा उद्योगात चिंतेची लाट निर्माण झाली आहे.

येत्या दोन दिवसांत अमेरिका आणखी १५ ते २० देशांना टॅरिफ लेटर पाठवू शकते, असं ट्रम्प यांनी नमूद केलं. यामुळे जागतिक व्यापारात तणाव आणखी वाढू शकतो. त्यांनी स्पष्ट केले की १ ऑगस्टच्या अंतिम मुदतीत कोणताही बदल होणार नाही. या टॅरिफ अनिश्चिततेमुळे अमेरिकन बाजारपेठा दबावाखाली राहिल्या.

Web Title: Stock Market Today Sensex opens down 76 points 3 sectors up why is the market volatile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.