Lokmat Money > बिझनेस न्यूज > Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट ओपनिंग, ३४ अंकांनी घसरुन उघडला सेन्सेक्स; का आहे बाजारावर दबाव?

Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट ओपनिंग, ३४ अंकांनी घसरुन उघडला सेन्सेक्स; का आहे बाजारावर दबाव?

Stock Market Today: शेअर बाजाराची आज फ्लॅट ओपनिंग दिसून आली. सेन्सेक्स ३४ अंकांनी घसरून ८३,३९८ वर आला. निफ्टी ११ अंकांच्या घसरणीसह २५,४५० वर उघडला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 09:59 IST2025-07-07T09:59:09+5:302025-07-07T09:59:09+5:30

Stock Market Today: शेअर बाजाराची आज फ्लॅट ओपनिंग दिसून आली. सेन्सेक्स ३४ अंकांनी घसरून ८३,३९८ वर आला. निफ्टी ११ अंकांच्या घसरणीसह २५,४५० वर उघडला.

Stock Market Today Flat opening of the stock market Sensex opens down by 34 points Why is there pressure on the market | Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट ओपनिंग, ३४ अंकांनी घसरुन उघडला सेन्सेक्स; का आहे बाजारावर दबाव?

Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट ओपनिंग, ३४ अंकांनी घसरुन उघडला सेन्सेक्स; का आहे बाजारावर दबाव?

Stock Market Today: शेअर बाजाराची आज फ्लॅट ओपनिंग दिसून आली. सेन्सेक्स ३४ अंकांनी घसरून ८३,३९८ वर आला. निफ्टी ११ अंकांच्या घसरणीसह २५,४५० वर उघडला. बँक निफ्टी ९३ अंकांनी घसरून ५६,९३८ वर उघडला. तर रुपया १८ पैशांनी घसरून ८६.५७/डॉलरवर बंद झाला आहे. शेअर बाजारातील या घसरणीचा परिणाम सेक्टोरल इंडेक्सवरही दिसून आला. एफएमसीजी आणि ऑइल गॅस वगळता इतर सर्व क्षेत्रांमध्ये घसरण दिसून आली. मेटल आणि मीडिया क्षेत्रात सर्वाधिक विक्री दिसून आली.

आज कामकाजादरम्यान ट्रेंट, एशियन पेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर मारुती, इटर्नल, एचसीएल टेक, टेक महिंद्रा आणि बीईएलच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली.

FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख

यामुळे बाजारात दबाव

जागतिक व्यापार, राजकीय घडामोडी आणि कॉर्पोरेट अपडेट्स दरम्यान, या आठवड्याची सुरुवात गुंतवणूकदारांसाठी अनेक महत्त्वाचे संकेत देत आहे. अमेरिकेनं टॅरिफ अंमलबजावणीची तारीख वाढवली आहे, तर भारतानं राष्ट्रीय हिताला प्राधान्य देण्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे, बाजारात कमकुवतपणा दिसून येत आहे आणि परदेशी गुंतवणूकदार सातत्यानं विक्री करत आहेत.

टॅरिफची अंतिम तारीख आता १ ऑगस्ट

अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसंट यांनी अमेरिकेसोबत व्यापार करार न केलेल्या देशांवरील टॅरिफ आता ९ जुलैऐवजी १ ऑगस्टपासून लागू होतील असं म्हटलंय. व्यापार संबंधांमध्ये संतुलन साधण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. या बदलामुळे भारताला निश्चितच काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे, परंतु दबावही कायम आहे. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी स्पष्ट केलंयकी, भारत कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही. ते म्हणाले की, भारत अंतिम तारीख काहीही असली तरी राष्ट्रीय हित लक्षात घेऊनच निर्णय घेतो. यावरून असं दिसून येतं की भारत आपली रणनीती बदलणार नाही.

Web Title: Stock Market Today Flat opening of the stock market Sensex opens down by 34 points Why is there pressure on the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.