Stock Market Today: आज कामकाजाच्या सुरुवातीच्या शेअर बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्स १२२ अंकांनी वाढून ८३,६५८ वर उघडला. निफ्टी ३५ अंकांनी वाढून २५,५११ वर उघडला. बँक निफ्टीबद्दल बोलायचं झालं तर, तो १२६ अंकांनी वाढून ५७,३३९ वर उघडला. रुपया ८५.६७ च्या तुलनेत ८५.६१ वर उघडला. सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचं झाले तर, आज ऑटो, आयटी आणि फार्मा वगळता जवळजवळ सर्व क्षेत्रांमध्ये वाढ दिसून आली. चांगली गोष्ट म्हणजे आज स्मॉल कॅप आणि मिडकॅप इंडेक्समध्येही थोडीशी वाढ दिसून येत आहे. मात्र शेअर बाजार उघडल्यानंतर काही वेळातच त्यात घसरणही दिसून आली.
कामकाजाच्या सुरुवातीला टाटा स्टील, पॉवर ग्रीड, बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक आणि बजाज फिनसर्व्हच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर दुसरीकडे टाटा मोटर्स, टीसीएस, डॉ रेड्डीज लॅब, विप्रो या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली.
अमेरिकन बाजारात तेजी
९ जुलैची अंतिम मुदत संपली आहे, परंतु भारत आणि अमेरिका यांच्यातील कोणत्याही व्यापार कराराची औपचारिक घोषणा अद्याप झालेली नाही. याबद्दल व्यापारी जगात आधीच बरीच अटकळ होती. दरम्यान, आता दोन्ही देश ठोस करारावर कधी पोहोचतील याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
टेक स्टॉक्सच्या जोरावर, मंगळवारी अमेरिकन बाजारात चांगली तेजी दिसून आली. नॅस्डॅक जवळजवळ २०० अंकांनी वाढून नवीन उच्चांकावर बंद झाला, तर डाउ जोन्सनेही २२५ अंकांची वाढ नोंदवली. तर, डाउ फ्युचर्स सध्या ७५ अंकांनी कमकुवत दिसत होता.