Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Stock Market Today: वीकली एक्सपायरीच्या दिवशी शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २५,९०० च्या वर, IT Stocks वर दबाव

Stock Market Today: वीकली एक्सपायरीच्या दिवशी शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २५,९०० च्या वर, IT Stocks वर दबाव

Stock Market Today: मंगळवारी देशांतर्गत शेअर बाजारात निफ्टीच्या वीकली एक्सपायरीच्या दिवशी बाजाराची सुरुवात तेजीसह झाली. सकाळी निफ्टी सुमारे ६० अंकांच्या वाढीसह २५,९०० च्या वर व्यवहार करत होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 09:40 IST2026-02-10T09:40:43+5:302026-02-10T09:40:43+5:30

Stock Market Today: मंगळवारी देशांतर्गत शेअर बाजारात निफ्टीच्या वीकली एक्सपायरीच्या दिवशी बाजाराची सुरुवात तेजीसह झाली. सकाळी निफ्टी सुमारे ६० अंकांच्या वाढीसह २५,९०० च्या वर व्यवहार करत होता.

Stock Market Today bullish start on weekly expiry day Nifty above 25900 pressure on IT stocks | Stock Market Today: वीकली एक्सपायरीच्या दिवशी शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २५,९०० च्या वर, IT Stocks वर दबाव

Stock Market Today: वीकली एक्सपायरीच्या दिवशी शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २५,९०० च्या वर, IT Stocks वर दबाव

Stock Market Today: मंगळवारी देशांतर्गत शेअर बाजारात निफ्टीच्या वीकली एक्सपायरीच्या दिवशी बाजाराची सुरुवात तेजीसह झाली. सकाळी निफ्टी सुमारे ६० अंकांच्या वाढीसह २५,९०० च्या वर व्यवहार करत होता. त्याच वेळी सेन्सेक्स १८५ अंकांच्या वाढीसह ८५,२४० च्या वर होता. बँक निफ्टी ६०,६९९ च्या आसपास सपाट पातळीवर व्यवहार करत होता. 

आज आयटी इंडेक्समध्ये दबाव दिसून आला आणि पीएसयू बँक इंडेक्समध्येही घसरण नोंदवण्यात आली. हे दोन विभाग वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक ग्रीन झोनमध्ये होते. यामध्ये सर्वाधिक तेजी कंज्युमर ड्युरेबल्स आणि केमिकल क्षेत्रात पाहायला मिळाली, तर मीडिया, फार्मा आणि हेल्थकेअर क्षेत्रातही वाढ दिसून आली.

Wife सोबत मिळून Post Office मध्ये उघडा खातं; दरमहा मिळेल ₹९,२५० चं फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?

शेअर्सची स्थिती आणि क्षेत्रीय हालचाल

निफ्टी ५० वर नजर टाकली असता Eternal, ONGC, Cipla, Titan, BEL आणि Sun Pharma या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. याउलट Shriram Finance, Bajaj Finance, Wipro, HCL Tech, SBI Life, Indigo, Hindalco आणि HDFC Bank या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. 

जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत

आज जागतिक बाजारातून मजबूत संकेत मिळत आहेत. टेक शेअर्सच्या जोरावर अमेरिकन बाजार सलग दुसऱ्या दिवशी वाढीसह बंद झाले, ज्याचा सकारात्मक परिणाम देशांतर्गत बाजाराच्या सुरुवातीवर दिसून येत आहे. कमोडिटीपासून ते एफआयआय (FII) फ्लो आणि कंपन्यांचे निकाल यांसारखे अनेक मोठे ट्रिगर्स आज बाजारासाठी महत्त्वाचे आहेत. आशियाई बाजारातून मिळणारे संकेतही सकारात्मक आहेत. गिफ्ट निफ्टी सुमारे ७५ अंकांच्या वाढीसह २६,००० च्या जवळ व्यवहार करत आहे, तर डाओ फ्युचर्स सपाट आहेत. विशेष म्हणजे, जपानचा निक्केई निर्देशांक सुमारे १३०० अंकांच्या उसळीसह विक्रमी पातळीवर पोहोचलाय.

अमेरिकन बाजारात टेक शेअर्सची लाट

टेक शेअर्सच्या जोरावर वॉल स्ट्रीटमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. डाओ जोन्स खालच्या पातळीवरून सुमारे ३०० अंकांच्या रिकव्हरीसह विक्रमी उच्चांकावर बंद झाला, तर नॅस्डॅकनं दुहेरी शतकी झेप घेतली. अमेरिकन बाजारात सलग दुसऱ्या दिवशी आलेल्या या तेजीमुळे जागतिक स्तरावर गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास दुणावला.

Web Title : साप्ताहिक एक्सपायरी पर शेयर बाजार की तेजी से शुरुआत; आईटी शेयरों पर दबाव

Web Summary : भारतीय शेयर बाजार साप्ताहिक एक्सपायरी पर तेजी के साथ खुला, निफ्टी 25,900 के ऊपर। आईटी क्षेत्र पर दबाव, लेकिन उपभोक्ता टिकाऊ और रसायन क्षेत्रों में लाभ देखा गया। एशियाई बाजारों से सकारात्मक संकेतों के साथ वैश्विक संकेत मजबूत हैं। जापान का निक्केई रिकॉर्ड ऊंचाई पर।

Web Title : Stock market opens strong on weekly expiry; IT stocks under pressure.

Web Summary : Indian stock market started positively on weekly expiry, Nifty above 25,900. IT sector faced pressure, but consumer durables and chemicals sectors saw gains. Global cues are strong with Asian markets showing positive signals. Japan's Nikkei hits record high.