Stock Market Today: जागतिक बाजारपेठेतील तेजी अजूनही कायम आहे. देशांतर्गत शेअर बाजारांसाठी मंथली एक्सपायरीचा आठवडा आजपासून सुरू होत आहे. अशा परिस्थितीत, आज, सोमवार (२७ ऑक्टोबर) शेअर बाजारातील कामकाज तेजीसह सुरू झालं. सेन्सेक्स २२० अंकांच्या तेजीसह व्यवहार करत होता. त्याच वेळी, निफ्टी देखील ७० अंकांनी वाढून २५,८७० च्या आसपास व्यवहार करत होता. बँक निफ्टी सुमारे २४० अंकांनी वाढ नोंदवत होता. मेटल आणि रियल्टी शेअर्समध्येही आज तेजी होती. त्याच वेळी, फार्मा निर्देशांकात थोडीशी घसरण दिसून येत होती.
निफ्टीवर, एसबीआय लाईफ, टाटा स्टील, हिंदाल्को, टीएमपीव्ही, भारती एअरटेल, रिलायन्सचे शेअर्स सर्वाधिक तेजीत होते, तर ओएनजीसी, बीईएल, कोटक बँक, डॉ. रेड्डी, बजाज फायनान्स, मॅक्स हेल्थ यांचे शेअर्स सर्वाधिक तोट्यात होते.
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
सुरुवातीच्या पातळींकडे पाहता, सेन्सेक्स ८६ अंकांनी वाढून ८४,२९७ वर उघडला. निफ्टी ४८ अंकांनी वाढून २५,८४३ वर उघडला. बँक निफ्टी ९७ अंकांनी वाढून ५७,७९६ वर उघडला. चलन बाजारात, रुपया १ पैशानं घसरुन ८७.८६/डॉलर्स वर उघडला.
जागतिक बाजारपेठेतील तेजीचा परिणाम आशियाई बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे. निक्केईमध्ये ८०० अंकांनी वाढ होऊन आतापर्यंतचा उच्चांक गाठला. देशांतर्गत निर्देशांकांबद्दल, गिफ्ट निफ्टी १०० अंकांच्या वाढीसह २५,९२५ च्या आसपास व्यवहार करत होता. डाऊ फ्युचर्स देखील २५० अंकांनी मजबूत राहिले, जे आज भारतीय बाजारासाठी मजबूत सुरुवात दर्शवते.
