Share Market Today: आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार सत्रात बाजाराची सुरुवात मंदावली. निफ्टी ३४ अंकांनी घसरून २५,९९९ वर उघडला आणि सेन्सेक्स १४० अंकांनी घसरून ८५,१२५ वर आला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देखील आज आपल्या पतधोरण समितीतील निर्णयांची माहिती जाहीर करणार आहे आणि बाजाराच्या भविष्यातील दिशेसाठी हे महत्त्वाचे ठरेल. दरम्यान, काल म्हणजेच गुरुवारी चार दिवसांची घसरण थांबली आणि निफ्टी ४८ अंकांनी वाढून २६,०३३ वर बंद झाला. काल ८९.९८ वर बंद झाल्यानंतर रुपया १४ पैशांनी वाढून ८९.८४ वर उघडला.
सुरुवातीच्या व्यवहारात बाजार स्थिर असून २६,००० च्या वर आहे. सेन्सेक्सच्या टॉप ३० शेअर्सपैकी १५ रे़ड झोनमध्ये आणि १५ ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत आहेत. कामकाजादरम्यान इटर्नल, मारुती, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि कोटक महिंद्रा बँक हे सर्वाधिक वाढणारे शेअर्स आहेत. रिलायन्स, ट्रेंट, टाटा स्टील आणि टेक महिंद्रा हे देखील सर्वाधिक घसरणारे शेअर्स ठरलेत. इटर्नलमध्ये सर्वाधिक १% वाढ झाली, तर रिलायन्समध्ये ०.७५% ची घसरण दिसून येत आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आज सकाळी १० वाजता पतधोरण समितीचे निर्णय जाहीर करतील. असं मानले जात आहे की रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात केली जाऊ शकते. या वर्षी आतापर्यंत आरबीआयनं तीन वेळा दर कपात केली आहे. पाच वर्षांनंतर, फेब्रुवारी २०२५ मध्ये, रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात करण्यात आली, ज्यामुळे तो ६.२५% वर आला. त्यानंतर एप्रिलमध्ये २५ बेसिस पॉइंट्स आणि जूनमध्ये ५० बेसिस पॉइंट्सची कपात करण्यात आली. सध्याचा रेपो दर ५.५% आहे.
