Lokmat Money > बिझनेस न्यूज > तीन दिवसांची घसरण थांबली! शेअर बाजारात जोरदार उसळी, 'या' फार्मा कंपन्यांचे शेअर्स तेजीत

तीन दिवसांची घसरण थांबली! शेअर बाजारात जोरदार उसळी, 'या' फार्मा कंपन्यांचे शेअर्स तेजीत

Stock Market : बुधवारी, शेअर बाजाराने मागील ३ दिवसांची कसर भरुन काढली. ग्रीन झोनमध्ये उघडल्यानंतर, सेन्सेक्स आणि निफ्टी वेगाने वाढताना दिसले. या काळात, फार्मा स्टॉक्स सर्वात वेगाने धावताना दिसले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 11:11 IST2025-05-21T11:10:44+5:302025-05-21T11:11:28+5:30

Stock Market : बुधवारी, शेअर बाजाराने मागील ३ दिवसांची कसर भरुन काढली. ग्रीन झोनमध्ये उघडल्यानंतर, सेन्सेक्स आणि निफ्टी वेगाने वाढताना दिसले. या काळात, फार्मा स्टॉक्स सर्वात वेगाने धावताना दिसले.

stock market rise these pharma stocks rise from sunpharma to emcure check latest update | तीन दिवसांची घसरण थांबली! शेअर बाजारात जोरदार उसळी, 'या' फार्मा कंपन्यांचे शेअर्स तेजीत

तीन दिवसांची घसरण थांबली! शेअर बाजारात जोरदार उसळी, 'या' फार्मा कंपन्यांचे शेअर्स तेजीत

Stock Market : गेल्या तीन दिवसांपासून शेअर बाजारात सुरू असलेली घसरण आज, बुधवारी थांबली. मुंबई शेअर बाजार (सेन्सेक्स) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (निफ्टी) दोन्ही निर्देशांक आज सकाळी जोरदार तेजीने उघडले. यामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. तत्पूर्वी, मंगळवारी, शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. दुपारनंतर बाजाराचा मूड अचानक बदलला आणि शेवटपर्यंत घसरण सुरूच राहिली. आज त्याची भरपाई होताना दिसत आहे.

बाजाराची दमदार सुरुवात
आज बाजार उघडताच सेन्सेक्स ५१६ अंकांपेक्षा जास्त वाढून ८१,६९८ च्या पातळीवर पोहोचला, तर निफ्टीही १०० अंकांपेक्षा जास्त वाढून २४,८३४ वर व्यवहार करत होता. सकाळी शेअर बाजारात व्यवहार सुरू झाले तेव्हा सेन्सेक्स ८१,३२७.६१ वर उघडला, जो त्याच्या मागील बंदपेक्षा जास्त होता. निफ्टीनेही २४,७४४.२५ वर व्यवहार सुरू केला आणि लगेचच १५० अंकांनी वाढ दर्शवली.

या शेअर्सनी बाजाराला आधार दिला
आज बाजारातील या तेजीमागे काही मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सचा मोठा हात होता. सनफार्मा, एम अँड एम (महिंद्रा अँड महिंद्रा), एचडीएफसी बँक आणि टाटा मोटर्स यांसारख्या कंपन्यांचे शेअर्स वेगाने वाढले. मिडकॅप श्रेणीतील कंपन्यांमध्ये ग्लॅक्सो, ग्लँड फार्मा आणि टॉरंट फार्मा यांचे शेअर्स चांगले वधारले. स्मॉलकॅप कंपन्यांमध्ये एचएलई ग्लासकोट, बँको इंडिया आणि बीएमडब्ल्यू यांच्या शेअर्समध्येही लक्षणीय वाढ दिसून आली.

फार्मा कंपन्यांची ताकद
आजच्या तेजीमध्ये औषध कंपन्यांचे (फार्मा) शेअर्स आघाडीवर होते. सन फार्मा, ग्लॅक्सो, ग्लँड फार्मा आणि टोरेंट फार्मा यांच्यासोबतच एमक्युअर फार्मा, अल्केम, अजंता फार्मा, ल्युपिन आणि अरबिंदो फार्मा यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही जोरदार वाढ झाली.

वाचा - अनंत अंबानींपेक्षाही मोठं लग्न? 'या' शाही विवाहात प्रत्येक पाहुण्यावर ४२ लाख होणार खर्च, २०० VIP

जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजाराने आज दमदार सुरुवात केली आणि फार्मा क्षेत्रातील कंपन्यांनी या तेजीला चांगलाच हातभार लावला. गेल्या काही दिवसांपासूनच्या घसरणीनंतर मिळालेल्या या उसळीमुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: stock market rise these pharma stocks rise from sunpharma to emcure check latest update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.