रेखा झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेल्या बाजार स्टाइल रिटेलच्या शेअर्समध्ये शुक्रवारी मोठी घसरण दिसून आली. शुक्रवारी सकाळच्या सुमारास बीएसईवर हा शेअर ४% हून अधिक वाधारला होता, परंतु नंतर विक्रीच्या दबावामुळे तो इंट्रा-डे उच्चांकापासून ११% घसरला आणि ३४७.५५ रुपयांवर आला. बाजार बंद होताना हा शेअर ५.९९% घसरणीसह ३५४.५० रुपयांवर स्थिरावला.
कंपनीने जुलै ते सप्टेंबर २०२५ या तिमाहीत वार्षिक आधारावर ७१% ची उल्लेखनीय वाढ नोंदवत ५३२ कोटी रुपयांचा महसूल कमावला. कंपनी सध्या २५० स्टोअर्सचे संचालन करते. दुसऱ्या तिमाहीत २० नवीन स्टोअर्स उघडली गेली, तर २ स्टोअर्स बंद झाली. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ४२ नवीन स्टोअर्स जोडली गेली आहेत.
रेखा झुनझुनवालांचा वाटा -
सप्टेंबर तिमाहीच्या आकडेवारीनुसार, रेखा झुनझुनवाला यांची बाजार स्टाइल रिटेलमध्ये ३.४% हिस्सेदारी आहे, ज्याची किंमत ९९ कोटी रुपये एवढी आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ४२८.२० रुपये आणि नीचांक १८१ रुपये आहे. सध्याचे कंपनीचे बाजार भांडवल २,६४५.१९ कोटी रुपये एवढे आहे.
शेअर बाजारातील कामगिरी
गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये ३% पेक्षा जास्त वाढ झाली, तर सहा महिन्यांत ७% ची वाढ नोंदवली गेली. मात्र, वर्षभरापासून शेअर्स होल्ड करणाऱ्या गुंतवणूकदारांना १३% पेक्षा जास्त नुकसान सहन करावे लागले आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)