पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीजला इस्रायलच्या एल्बिट सिक्युरिटी सिस्टम्सकडून ३४ कोटी रुपयांची ऑर्डर मिळवली आहे. या करारांतर्गत कंपनीला विशेष इलेक्ट्रो-ऑप्टिक्स उत्पादनांचा पुरवठा करायचा आहे. कंपनी ही ऑर्डर फेब्रुवारी २०२६ ते नोव्हेंबर २०२६ दरम्यान पूर्ण करेल. मात्र, या सकारात्मक बातमीनंतरही कंपनीच्या शेअरमध्ये २.२६% ची घसरण होऊन तो ६९४.७५ रुपये वर बंद झाला.
पारस डिफेन्सचे ऑर्डर बुक सातत्याने मजबूत होत आहे. कंपनीला ऑगस्ट २०२५ मध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडून ४५ कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. यात सिग्नल, डेटा प्रोसेसिंग सिस्टिम आणि मल्टी-सेंसर फ्यूजन सिस्टम्स सप्लाय करेल. तर इंडिया ऑप्टेलकडून २६.६ कोटी रुपये किंमतीची ऑर्डर मिळाली आहे. याअंतर्गत कंपनी, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टम सप्लाय करेल, याचा वापर बॅटल टँकमध्ये थर्मल इमेजिंग फायर कंट्रोल सिस्टम्समध्ये केला जाईल.
तसेच, फ्रान्सच्या सर्बेअरकडून २२.२१ कोटी रुपये किंमतीचा ऑर्डर मिळाली आहे, यानुसार, कंपनीला ३० युनिट्स CHIMERA 200 अँटी-ड्रोन तंत्रज्ञानाचा पुरवठा केला जाईल. महत्वाचे म्हणजे, पारस डिफेन्स मिसाइल्स, स्पेस टेक्नॉलॉजी, नेवल आणि डिफेन्स व्हेईकल्ससाठी आवश्यक गाइडन्स, कम्यूनिकेशन सेंसर आणि कंट्रोल सिस्टम्स आदींचा पुरवठा करते.
ही कंपनी पब्लिक आणि प्रायव्हेट क्षेत्रातील मोठ्या ऑर्डर्ससह भारतातील आघाडीच्या संरक्षण कंपन्यांपैकी एक आहे. गेल्या सहा महिन्यांत शेअरमध्ये ४४% आणि मागील महिन्यात ८.९३% वाढ झाली आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)