Share Market Opening 29 October, 2025: बुधवारी देशांतर्गत शेअर बाजाराने किरकोळ वाढीसह कामकाजाला सुरुवात केली. आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी, बीएसई सेन्सेक्स ३५.५२ अंकांची (०.०४%) किरकोळ वाढ घेत ८४,६६३.६८ अंकांवर उघडला. त्याचप्रमाणे, एनएसईच्या निफ्टी ५० इंडेक्सने देखील ४५.८० अंकांची (०.१८%) वाढ घेऊन २५,९८२.०० अंकांवर कामकाजाला सुरुवात केली. गेल्या आठवड्यात बीएसईचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स २५९.६९ अंकांनी (०.३० टक्के) वाढीसह बंद झाला होता. गेल्या आठवड्यात गुरुवारी सेन्सेक्सनं ८५,२९०.०६ अंकांच्या आपल्या नव्या ५२-आठवड्यांच्या उच्चांकाला स्पर्श केला होता.
निफ्टी ५० च्या ४१ कंपन्या ग्रीन झोनमध्ये
बुधवारी सेन्सेक्समधील ३० पैकी २६ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह ग्रीन झोनमध्ये उघडले आणि ९ कंपन्यांच्या शेअर्सनी घसरणीसह रेड झोनमध्ये कामकाजाला सुरुवात केली. तर, इन्फोसिसचे शेअर्स कोणताही बदल न होता उघडले. त्याचप्रमाणे, आज निफ्टी ५० मधील ५० पैकी ४१ कंपन्यांच्या शेअर्सनी तेजीसह ग्रीन झोनमध्ये कामकाजाला सुरुवात केली आणि उर्वरित ५ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह रेड झोनमध्ये उघडले, तर इतर ४ कंपन्यांचे शेअर्स कोणताही बदल न होता उघडले. सेन्सेक्स कंपन्यांमध्ये सामील असलेल्या टायटनच्या शेअर्सनी आज सर्वाधिक ०.६२ टक्के वाढीसह सुरुवात केली, तर महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्सनी सर्वाधिक ०.५९ टक्के घसरणीसह कामकाजाला सुरुवात केली.
PPF ला साधं समजू नका! पती-पत्नी मिळून बनवू शकता ₹१.३३ कोटींचा फंड, तोही टॅक्स फ्री
कोणत्या शेअर्सनी वाढीसह केली सुरुवात
सेन्सेक्सच्या उर्वरित कंपन्यांमध्ये आज एलअँडटीचे शेअर्स ०.६१ टक्के, एचसीएल टेक ०.५० टक्के, कोटक महिंद्रा बँक ०.४६ टक्के, सन फार्मा ०.४२ टक्के, एनटीपीसी ०.३७ टक्के, अडाणी पोर्ट्स ०.३७ टक्के, एशियन पेंट्स ०.३६ टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीज ०.३३ टक्के, मारुती सुझुकी ०.३३ टक्के, ट्रेंट ०.३१ टक्के, पावरग्रिड ०.२९ टक्के, भारतीय स्टेट बँक ०.२८ टक्के, टाटा स्टील ०.२७ टक्के, एचडीएफसी बँक ०.२० टक्के, हिंदुस्तान यूनिलीवर ०.१७ टक्के, टेक महिंद्रा ०.१५ टक्के, आयसीआयसीआय बँक ०.१० टक्के, टीसीएस ०.०६ टक्के आणि बीईएलचे शेअर्स ०.०५ टक्क्यंच्या वाढीसह उघडले.
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण
दुसरीकडे, आज टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्सच्या शेअर्सनी ०.४९ टक्के, भारती एअरटेल ०.३६ टक्के, एटरनल ०.१८ टक्के, एक्सिस बँक ०.०९ टक्के, बजाज फिनसर्व ०.०८ टक्के, आयटीसी ०.०८ टक्के, बजाज फायनान्स ०.०४ टक्के आणि अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर्सनी ०.०३ टक्के घसरणीसह कामकाजाला सुरुवात केली.
