शुक्रवारी (१० जानेवारी) आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात किरकोळ तेजीसह झाली. सेन्सेक्स ६२ अंकांनी वधारून ७७,६८२ वर उघडला. तर निफ्टी २५ अंकांनी वधारून २३,५५१ वर उघडला. बँक निफ्टी ७७ अंकांनी घसरून ४९,४२६ वर उघडला.
लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कामकाजादरम्यान, आयटी निर्देशांकात मोठी वाढ झाली. निर्देशांक अडीच टक्क्यांहून अधिक वधारला. रियल्टी, ऑइल अँड गॅस निर्देशांकातही तेजी होती. एफएमसीजी, पीएसयू बँक, ऑटोमध्ये सर्वाधिक दबाव दिसून आला. निफ्टीवर टीसीएस, टेक महिंद्रा, विप्रो, इन्फोसिस, एचसीएल टेक या कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले. इंडसइंड बँक, बीईएल, एनटीपीसी, टाटा कन्झ्युमर, एसबीआय यांचे समभाग सर्वाधिक घसरले.
काल अमेरिकन बाजार बंद होते, परंतु अमेरिकन फ्युचर्स मध्ये घसरण होती. अमेरिकेतील डिसेंबरच्या रोजगाराच्या आकडेवारीपूर्वी डाऊ फ्युचर्स १५० अंकांनी घसरले होते, तर निक्केई ३०० अंकांनी घसरला. गिफ्ट निफ्टीही ५४ अंकांनी घसरून २३,५९२ च्या पातळीवर बंद झाला. कालच्या घसरणीत एफआयआयनं निर्देशांक आणि शेअर फ्युचर्समध्ये १२८०० कोटी रुपयांची मोठी विक्री केली, ज्यात ७२०० कोटी रुपयांची कॅश होती. परंतु देशांतर्गत फंडांमध्येही सलग १७ व्या दिवशी ७६०० कोटी रुपयांची मोठी खरेदी झाली.