Share Market : आज भारतीय शेअर बाजारात फारशी मोठी हालचाल दिसली नाही. निर्देशांक कालच्या पातळीच्या आसपासच राहिले, म्हणजेच बाजारात सध्या 'वेट अँड वॉच'ची भूमिका दिसून येत आहे. गेल्या अनेक दिवसांच्या तेजीनंतर आता बाजारात थोडी विश्रांती आहे. तज्ज्ञांच्या मते, सध्या बाजारात मोठी गुंतवणूक करण्याची संधी नाही, त्यामुळे व्यापाऱ्यांना काही दिवस विशिष्ट कंपन्यांच्या शेअर्सवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला जात आहे. दुसरीकडे, जे दीर्घकालीन गुंतवणूकदार आहेत, त्यांना तज्ज्ञांनी 'घसरणीवर खरेदी करा' हा सल्ला दिला आहे.
बाजाराची आजची स्थिती
नवीन तिमाहीची (जुलै-सप्टेंबर) सुरुवात बाजाराने थोड्या वाढीने केली.
- आज (मंगळवार, १ जुलै) मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ९०.८३ अंकांनी वाढून ८३,६९७.२९ वर बंद झाला.
- राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५० मात्र २४.७५ अंकांनी घसरून २५,५४१.८० वर बंद झाला.
कोणत्या शेअर्समध्ये वाढ-घट?
आज सेन्सेक्समधील ३० पैकी १३ कंपन्यांचे शेअर्स वाढले, तर १७ कंपन्यांचे शेअर्स घसरले. निफ्टी ५० मध्येही ५० पैकी २४ कंपन्यांचे शेअर्स वाढले, तर २६ कंपन्यांचे शेअर्स घसरले.
सर्वाधिक वाढ: सेन्सेक्समध्ये बीईएलचे शेअर्स सर्वाधिक २.५१% वाढले.
सर्वाधिक घट: ॲक्सिस बँकेचे शेअर्स सर्वाधिक २.१३% घसरले.
वाढलेले प्रमुख शेअर्स:
रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, टायटन, भारती एअरटेल, हिंदुस्तान युनिलिव्हर, टाटा स्टील, बजाज फायनान्स, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इन्फोसिस या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ दिसली.
घसरलेले प्रमुख शेअर्स
ट्रेंट, एटरनल, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, एनटीपीसी, पॉवरग्रिड, एचसीएल टेक, टाटा मोटर्स, सन फार्मा, अदानी पोर्ट्स, आयटीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती सुझुकी, बजाज फिनसर्व्ह आणि लार्सन अँड टुब्रो या कंपन्यांचे शेअर्स घसरले.
वाचा - Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?
आज शेअर बाजार एका विशिष्ट रेंजमध्ये राहिला. मोठ्या उलाढालीची वाट न पाहता, गुंतवणूकदारांनी निवडक स्टॉक्सवर लक्ष केंद्रित करावे असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.