Vodafone Idea Share Price: दूरसंचार क्षेत्रातील कंपनी व्होडाफोन आयडिया गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. तर दुसरीकडे बाजारातील कमकुवत भावना असूनही व्होडाफोन आयडियाच्या शेअरच्या किंमतीत वाढ होताना दिसतेय. गेल्या आठवडाभरात हा शेअर १४ टक्क्यांनी वधारलाय.
व्होडाफोन आयडिया लिमिटेडच्या शेअरचा भाव सोमवारी एक टक्क्यांनी वाढून ७.५१ रुपयांवर व्यवहार करत होता. या कंपनीचं मार्केट कॅप ८०.३९ हजार कोटी रुपये झालंय. गेल्या ५ ट्रेडिंग सेशनमध्ये हा शेअर १० टक्क्यांनी वधारला आहे. या काळात व्होडाफोन आयडियाचे ग्राहक कमी झाले आणि कंपनी स्पर्धकांच्या तुलनेत पिछाडीवर असली तरी शेअरच्या किमती वाढतच राहिल्याचं दिसून आलंय. किरकोळ गुंतवणूकदारांना हा शेअर मल्टीबॅगर होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, व्होडाफोन आयडियामध्ये किरकोळ गुंतवणूकदार खूप सक्रिय असून शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार किरकोळ गुंतवणूकदारांचा या शेअरमध्ये १५.४ टक्के हिस्सा आहे.
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
सबस्क्रायबर्स झाले कमी
व्होडाफोन आयडियाच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांचा रस सातत्यानं वाढत आहे. व्होडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये ७ ट्रेडिंग सेशनमध्ये १४% वाढ झाली आहे. मात्र, मे महिन्यात कंपनीचा मार्केट शेअर तसेच अॅक्टिव्ह सबस्क्रायबर्समध्ये घट झाली आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या रिपोर्टनुसार, व्होडाफोन आयडियाचे सक्रिय ग्राहक मे २०२५ मध्ये १३ लाखांनी कमी होऊन १७.३ कोटी झाले, तर स्पर्धकांसाठी ते ७४ लाखांनी वाढले.
याशिवाय अॅक्टिव्ह सब्सक्राइबर मार्केटमध्ये कंपनीचा वाटा ही २३ बेसिस पॉईंट्सने घसरून १६ टक्के झाला आहे, तर रिलायन्स जिओचा हिस्सा ४२.८ टक्के आणि भारती एअरटेलचा हिस्सा ३५.८ टक्के आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)