Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजार घसरला; सेन्सेक्स ८२,६२६ तर निफ्टी २५,३२७ अंकांवर बंद

शेअर बाजार घसरला; सेन्सेक्स ८२,६२६ तर निफ्टी २५,३२७ अंकांवर बंद

SEBI च्या क्लीन चिटमुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये उसळी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 16:07 IST2025-09-19T16:06:42+5:302025-09-19T16:07:37+5:30

SEBI च्या क्लीन चिटमुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये उसळी!

Stock Market Highlights: Stock market falls; Sensex closes at 82,626, Nifty at 25,327 points | शेअर बाजार घसरला; सेन्सेक्स ८२,६२६ तर निफ्टी २५,३२७ अंकांवर बंद

शेअर बाजार घसरला; सेन्सेक्स ८२,६२६ तर निफ्टी २५,३२७ अंकांवर बंद

Stock Markets: आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात, म्हणजेच आज(दि.१९) शेअर बाजार घसरला. सेन्सेक्स ३८७ अंकांनी घसरून ८२,६२६ वर बंद झाला, तर निफ्टी ९६ अंकांनी घसरून २५,३२७ वर बंद झाला. यादरम्यान, MIDCAP१०० निर्देशांक किरकोळ वाढून ५९,०८० वर बंद झाला, तर SMALLCAP निर्देशांक ३१.४% च्या वाढीसह १८५०८ वर बंद झाला.

सकाळची सुरुवात कमकुवत झाली. जागतिक बाजारपेठेत वाढ झाली असली तरी, आज भारतीय बाजारात काही कमकुवतपणा दिसून आला. सेन्सेक्स ६७ अंकांनी घसरून ८२,९४६ वर उघडला. तर, निफ्टी १३ अंकांनी घसरून २५,४१० वर उघडला. निफ्टीवर, HCL TECH -१.९%, ICICI बँक -१.४%, NESTLE -१.३% आणि M&M -१.३% ने घसरले. तर, भारती एअरटेल १.२%, आयशर मोटर ०.७%, सन फार्मा ०.५% आणि एसबीआय लाईफ इन्शुरन्स ०.९% वाढीसह बंद झाले.

एनएसईवरील बहुतेक निर्देशांक खाली आले. आयटी, खाजगी बँक, एफएमसीजी आणि एनबीएफसी निर्देशांक वर होते. यादरम्यान, पीएसयू बँक, फार्मा आणि मेटल शेअर्स वर होते. तर, हिंडेनबर्ग प्रकरणात सेबीच्या क्लीन चिटच्या बातमीनंतर अदानी शेअर्समध्ये लक्षणीय वाढ दिसून आली. 

टॉप गेनर्स: Adani Enterprises, Adani Ports, Shriram Finance, Jio Financials, HDFC Life, SBI Life
टॉप लूझर्स: Nestle, TCS, Grasim, Power Grid, ICICI Bank, HCL Tech

अदानी ग्रुपला मोठा दिलासा

हिंडनबर्ग प्रकरणात सेबीने अदानी ग्रुपला मोठा दिलासा दिला आहे. सेबीने सर्व आरोप फेटाळून गौतम अदानी आणि त्यांच्या कंपन्यांविरोधातील चौकशी बंद केली आहे. या घडामोडीचा परिणाम म्हणून अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्ससह सर्व अदानी ग्रुप शेअर्समध्ये तेजी दिसून आली.

(टीप- शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Stock Market Highlights: Stock market falls; Sensex closes at 82,626, Nifty at 25,327 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.