Stock Market Today: ऑपरेशन सिंदूरनंतर शेअर बाजारात दिसलेली तेजी आज थांबली. कामकाजाच्या सुरुवातीला सेन्सेक्स १८० अंकांनी घसरून ८२,२४९ वर खुला झाला. निफ्टी ६० अंकांच्या घसरणीसह २४,८६४ वर उघडला. बँक निफ्टी १४९ अंकांनी घसरून ५५,२३३ वर उघडला. तर, रुपया ८५.३७ च्या तुलनेत ८४.६३/डॉलरवर उघडला. दरम्यान, उघडल्यानंतर काही वेळातच सेन्सेक्स ५०० अंकांच्या जवळपास घसरला, तर निफ्टीही १०० अंकांनी घसरला.
सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचे झाले तर फार्मा सेक्टरमध्ये आज सकाळी एक टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली. यामागे ट्रम्प यांचा नवा निर्णय होता. निफ्टी आयटी आणि मेटल सेक्टरमध्ये मात्र विक्री दिसून आली.
चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
यामध्ये तेजी/घसरण
कामकाजादरम्यान सनफार्मा, इंडसइंड बँक, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स आणि मारुतीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर एचसीएल टेक, पॉवरग्रिड, कोटक बँक, इटर्नल आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्ये घसरण झाली.
ट्रम्प यांचा महत्त्वाचा निर्णय
अमेरिकेत ट्रम्प यांनी औषधांच्या किमती कमी करण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली, ज्याचा भारतीय फार्मा कंपन्यांवर परिणाम होऊ शकतो. तर दुसरीकडे भारतीय बाजारपेठेत आज पेटीएम आणि केफिन टेकमध्ये मोठी ब्लॉक डील होण्याची शक्यता आहे. एप्रिलचा किरकोळ महागाई दर ३.२५ टक्क्यांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.