Lokmat Money > बिझनेस न्यूज > Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

Stock Market Today: देशांतर्गत शेअर बाजारात आज निफ्टीची मंथली एक्सपायरी आहे. सात दिवसांपासून शेअर बाजारात तेजी दिसत होती, मात्र आज घसरणीसह व्यवहाराला सुरुवात झाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 09:48 IST2025-04-24T09:47:51+5:302025-04-24T09:48:07+5:30

Stock Market Today: देशांतर्गत शेअर बाजारात आज निफ्टीची मंथली एक्सपायरी आहे. सात दिवसांपासून शेअर बाजारात तेजी दिसत होती, मात्र आज घसरणीसह व्यवहाराला सुरुवात झाली.

Stock market dowm after 7 days of rally Sensex falls 140 points Tata Consumer Eternal ONGC top losers | Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

Stock Market Today: देशांतर्गत शेअर बाजारात आज निफ्टीची मंथली एक्सपायरी आहे. सात दिवसांपासून शेअर बाजारात तेजी दिसत होती, मात्र आज घसरणीसह व्यवहाराला सुरुवात झाली. सेन्सेक्स १६० अंकांनी घसरला होता. निफ्टीही ५० अंकांनी घसरून २४,२८० च्या आसपास व्यवहार करत होता. बँक निफ्टी २०० अंकांनी घसरला. निफ्टी मिडकॅप निर्देशांकात किंचित तेजी होती. निफ्टीवर सर्वात मोठी घसरण टाटा कन्झ्युमर, इटर्नल, ओएनजीसी सारख्या शेअर्समध्ये झाली.

जागतिक बाजारातून काय संकेत?

चीनसोबतच्या व्यापार युद्धात ट्रम्प बॅकफूटवर असल्याचं दिसून येत आहे. त्यांनी चीनवरील आयात शुल्कात मोठी कपात करण्याचे संकेत दिलेत. १४५ टक्के दर खूप जास्त असल्याचं त्यांनी म्हटलंय. अशा परिस्थितीत, ट्रम्प यांच्या चीनवरील मवाळ भूमिकेमुळे, अमेरिकन बाजारपेठेत सलग दुसऱ्या दिवशी वाढ दिसून आली. दिवसाच्या उच्चांकापासून ८०० अंकांनी घसरूनही, डाऊ ४२५ अंकांनी वधारला, तर नॅस्डॅक देखील ४०० अंकांनी वधारला. गिफ्ट निफ्टी ५० अंकांनी घसरून २४२५० च्या जवळ होता. डाऊ फ्युचर्स फ्लॅट होते. निक्केई ३०० अंकांनी वधारला. 

ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

काल १०० डॉलर्सच्या मोठ्या घसरणीनंतर, सोन्याचा भाव ५० डॉलर्सनं वाढून ३३५० डॉलर्सच्या जवळ पोहोचला, परंतु देशांतर्गत बाजारात तो २६०० रुपयांनी घसरून ९४,८०० रुपयांच्या खाली आला. चांदी २१०० रुपयांनी वाढून ९८,००० रुपयांच्या जवळ पोहोचली. उत्पादन वाढण्याची शक्यता असल्यानं कच्च्या तेलाचा भाव २ टक्क्यांनी घसरून ६६ डॉलर्सच्या जवळ आला.

चौथ्या तिमाहीचे निकाल

चौथ्या तिमाहीच्या निकालाबद्दल बोलायचं झालं तर पर्सिस्टंट सिस्टिम्सचे निकाल खूप चांगले होते. टाटा कन्झ्युमर, डालमिया भारत आणि एलटीआयमिंडट्रीचे निकाल अपेक्षेप्रमाणे आले असले तरी सिंजीनचे निकाल अत्यंत खराब होते. आज निफ्टीमध्ये अॅक्सिस बँक, टेक महिंद्रा, एचयूएल, नेस्ले आणि एसबीआय लाइफचे निकाल जाहीर होतील. त्यामुळे एफ अँड ओमधील एसीसी, एमफॅसिस आणि लॉरस लॅबसह ९ निकालांवर बाजाराचं लक्ष असेल. बजाज फायनान्सवरही बाजाराचं लक्ष असणार आहे. कंपनीचे संचालक मंडळ २९ एप्रिल रोजी शेअर्स स्प्लिट आणि बोनस शेअर्स विशेष लाभांशाबाबत निर्णय घेईल.

Web Title: Stock market dowm after 7 days of rally Sensex falls 140 points Tata Consumer Eternal ONGC top losers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.