Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले

बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले

Share Market Today: आज, शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली. सेन्सेक्स जवळजवळ ६०० अंकांनी घसरला, तर निफ्टी २६,००० च्या खाली आला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 17:12 IST2025-10-30T17:12:36+5:302025-10-30T17:12:36+5:30

Share Market Today: आज, शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली. सेन्सेक्स जवळजवळ ६०० अंकांनी घसरला, तर निफ्टी २६,००० च्या खाली आला.

Stock Market Crash Nifty Falls Below 26,000 as Investors Lose ₹1.82 Lakh Crore on Fed Policy Uncertainty | बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले

बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले

Share Market Today : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या धोरणांबद्दल निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे आज, गुरुवारी (३० ऑक्टोबर) भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स सुमारे ६०० अंकांनी कोसळला, तर निफ्टी पुन्हा एकदा २६,००० च्या महत्त्वाच्या पातळीच्या खाली बंद झाला. या मोठ्या घसरणीमुळे आज एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.

घसरणीचे मुख्य कारण
फेडरल रिझर्व्हने व्याजदरात ०.२५% ची कपात केली असली तरी, या वर्षात पुढे आणखी कपातीची शक्यता कमी असल्याचे संकेत दिले आहेत. यामुळे गुंतवणूकदार गोंधळात पडले आणि जागतिक बाजारात सावधगिरी वाढली, ज्याचा थेट परिणाम भारतीय बाजारावर झाला. परिणामी निफ्टी १७६.०५ अंकांनी (०.६८%) घसरून २५,८७७.८५ अंकांवर बंद झाला. तर सेन्सेक्स ५९२.६७ अंकांनी (०.७०%) कोसळून ८४,४०४.४६ च्या पातळीवर स्थिरावला. या मोठ्या घसरणीतही बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्स मात्र जवळपास सपाट पातळीवर बंद झाले.

फार्मा आणि फायनान्समध्ये मोठी विक्री
आज बाजारात जवळपास सर्वच प्रमुख क्षेत्रांमध्ये विक्रीचा दबाव दिसून आला, यात फार्मा आणि फायनान्शियल सेवा सर्वाधिक प्रभावित झाल्या.
निफ्टी हेल्थकेअर इंडेक्स ०.८१% ने तुटला. फायनान्शियल सर्व्हिसेस आणि प्रायव्हेट बँक इंडेक्समध्ये जवळपास ०.७% ची घसरण झाली.
आयटी, एफएमसीजी आणि ऑटो सेक्टरमध्येही किरकोळ कमजोरी नोंदवली गेली.
निफ्टी रियल्टी इंडेक्स ०.१३% वाढीसह बंद झाला, हा दिवसभरातील एकमेव वाढ नोंदवणारा क्षेत्रीय निर्देशांक ठरला.

गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान
बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल काल (४७४.२७ लाख कोटी रुपये) च्या तुलनेत आज ४७२.४५ लाख कोटी रुपयांवर आले.
याचा अर्थ, आज गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे १.८२ लाख कोटी रुपयांची घट झाली.

आजचे टॉप गेनर्स आणि लूजर्स
सर्वाधिक तेजी असलेले सेंसेक्स स्टॉक्स :

  1. लार्सन अँड टुब्रो : ०.९१%
  2. भारत इलेक्ट्रॉनिक्स : ०.६६%
  3. अल्ट्राटेक सिमेंट : ०.६६%
  4. मारुती सुझुकी : ०.४२%
  5. अदानी पोर्ट्स : ०.२२%

सर्वाधिक घसरलेले सेंसेक्स स्टॉक्स

  • भारती एअरटेल : -१.५४%
  • पॉवरग्रिड : -१.४५%
  • टेक महिंद्रा : -१.४०%
  • इन्फोसिस : -१.१५%
  • बजाज फायनान्स : -१.०४%

वाचा - जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका

आज एकूण ४,३२२ शेअर्समध्ये व्यवहार झाला, त्यापैकी २,२९१ शेअर्समध्ये घसरण तर केवळ १,८७६ शेअर्स तेजीसह बंद झाले. बाजारातील अस्थिरता आणि जागतिक संकेत पुढील काळातही महत्त्वाचे ठरतील.
 

Web Title : बाजार में 'ब्लैक थर्सडे'! निवेशकों को ₹1.82 लाख करोड़ का नुकसान।

Web Summary : फेडरल रिजर्व की अनिश्चितता के कारण भारतीय शेयर बाजार में गिरावट। सेंसेक्स और निफ्टी में गिरावट, निवेशकों को ₹1.82 लाख करोड़ का नुकसान। फार्मा और वित्त क्षेत्र सबसे अधिक प्रभावित।

Web Title : Black Thursday Market Crash: Investors Lose ₹1.82 Lakh Crore.

Web Summary : Indian stock market crashes due to Federal Reserve uncertainty. Sensex and Nifty fall, resulting in ₹1.82 lakh crore investor losses. Pharma and finance sectors were hit hardest.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.