Lokmat Money > बिझनेस न्यूज > आठव्या वर्षापासून औषध बनवायचे घेतले धडे, आता ७० देशांत व्यवसाय; 'पद्म' पुरस्काराचे मानकरी पंकज पटेल यांची यशोगाथा

आठव्या वर्षापासून औषध बनवायचे घेतले धडे, आता ७० देशांत व्यवसाय; 'पद्म' पुरस्काराचे मानकरी पंकज पटेल यांची यशोगाथा

Padma Bhushan Pankaj Patel Success Story: जर तुम्हाला यशाचं शिखर गाठायचं असेल तर अपार मेहनत करणं आवश्यक आहे. आज आपण अशाच एका व्यक्तीची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्यांनी अगदी आठाव्या वर्षी औषधांच्या कंपनीत जाण्यास सुरुवात केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 10:20 IST2025-01-27T10:17:55+5:302025-01-27T10:20:49+5:30

Padma Bhushan Pankaj Patel Success Story: जर तुम्हाला यशाचं शिखर गाठायचं असेल तर अपार मेहनत करणं आवश्यक आहे. आज आपण अशाच एका व्यक्तीची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्यांनी अगदी आठाव्या वर्षी औषधांच्या कंपनीत जाण्यास सुरुवात केली.

started doing pharmaceutical factory at the age of 8 now doing business in 70 countries success story Pankaj Patel zydus lifesciences who received the Padma Award | आठव्या वर्षापासून औषध बनवायचे घेतले धडे, आता ७० देशांत व्यवसाय; 'पद्म' पुरस्काराचे मानकरी पंकज पटेल यांची यशोगाथा

आठव्या वर्षापासून औषध बनवायचे घेतले धडे, आता ७० देशांत व्यवसाय; 'पद्म' पुरस्काराचे मानकरी पंकज पटेल यांची यशोगाथा

Padma Bhushan Pankaj Patel net worth : जर तुम्हाला यशाचं शिखर गाठायचं असेल तर अपार मेहनत करणं आवश्यक आहे. आज आपण अशाच एका व्यक्तीची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्यांनी अगदी आठाव्या वर्षी औषधांच्या कंपनीत जाण्यास सुरुवात केली. इतकंच काय तर आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी आपल्या कंपनीला यशाच्या शिखरावर पोहोचवलं. त्यांचं नाव आहे पंकज पटेल. पंकज पटेल यांचा नुकतान पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या आजवरच्या प्रवासावर एक नजर टाकूया.

झायडस लाइफसायन्सेसचे (Zydus Lifesciences) चेअरमन पंकज पटेल यांचा जन्म एका संपन्न कुटुंबात झाला. व्यवसाय हा त्यांच्या रक्तातच होता. त्यांचे वडील रमणभाई पटेल यांनी त्यांचे मित्र इंद्रवर्धन मोदी यांच्यासोबत कॅडिला हेल्थकेअरची स्थापना केली.

१९५२ मध्ये सुरुवात

रमणभाई पटेल यांनी विटामिन तयार करण्याच्या उद्देशानं १९५२ मध्ये कॅडिला हेल्थकेअरची स्थापना केली. १९९५ मध्ये झायडस ग्रुपअंतर्गत कॅडिला हेल्थकेअर आणि कॅडिला लॅबोरेटरीज या स्वतंत्र संस्था करण्यात आल्या. पंकजभाई पटेल यांना आधी फार्मासिस्ट व्हायचं होतं. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी ते वडिलांसोबत कंपनीत जायचे आणि टॅब्लेट बनवण्याच्या मशिनवर काम करणाऱ्या कामगारांना बघायचे.

पंकज पटेल यांनी कॅडिला हेल्थकेअरची सूत्रं हाती घेतली तेव्हा त्यांच्यासमोर काही आव्हानं होती. कंपनीचं मूल्यांकन २५० कोटी रुपये होतं, तर व्यवस्थापन, संशोधन, कंपनीचा खर्च आणि कर्मचारी यासह त्यांचा खर्च ४०० कोटी रुपये होता. अशा परिस्थितीत कंपनीला दीर्घकाळ टिकणं कठीण झालं होतं. हळूहळू त्यांनी इतके काम केलं की गेल्या वर्षीपर्यंत झायडसचं मार्केट कॅप १,१३,४६७.९८ कोटी रुपये आहे. मार्च २०२४ मध्ये कंपनीनं ३,३३२.४० कोटी रुपयांची विक्री केली, तर निव्वळ नफा १,४०५.२० कोटी रुपये होता.

यात ठरली पहिली कंपनी

हाय कोलेस्ट्रॉल डायबिटिसवर औषध बनवणारी ही देशातील पहिली कंपनी आहे. २०१३ मध्ये कंपनीला हे औषध विकण्यासाठी नियामकांची परवानगी मिळाली होती. हे औषध रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल दोन्हीसाठी प्रभावी होतं. यानंतर कंपनीनं ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी एक वेगळी गोळीही तयार केली. तुम्ही शुगर फ्रीचं (Sugar-Free) नाव ऐकलं असेलच. झायडस वेलनेसने तयार केलेला हा ब्रँड आहे, जो डायबिटीक लोकांसाठी साखरेचा पर्याय बनला. एव्हरयूथ फेस वॉश (Everyuth face wash) हे देखील याच कंपनीचे उत्पादन आहे, जे खूप प्रसिद्ध आहे.

७० देशांमध्ये व्यवसाय

आज या कंपनीचा व्यवसाय जगभरातील ७० देशांमध्ये पसरलेला आहे. भारतातच कंपनीची सुमारे ३०० उत्पादनं आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ५०० हेल्थकेअर उत्पादनं विकली जातात. पटेल यांचा योग्य विचार आणि दृष्टिकोन या यशामागे काम करत आहे. त्यांचा भारतीय शास्त्रज्ञांच्या प्रतिभेवरही विश्वास आहे, संशोधन आणि विकासावर पैसा खर्च करण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत. यामुळे कंपनीने आतापर्यंत अनेक लसी आणि औषधं तयार केली आहेत.

स्वाईन फ्लूवर औषध शोधण्यात महत्त्वाची भूमिका

स्वाईन फ्लूचा फैलाव झाला तेव्हा त्याचं औषध तयार करण्यात पंकज पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. व्हॅक्सीफ्लू-एस नावाचं औषध बाजारात आणण्यासाठी कंपनीनं ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून परवानगी घेतली होती. ही पहिली भारतीय एच१एन१ लस होती. जगभरातील काही निवडक लसींमध्येही त्याचं नाव समाविष्ट आहे.

फोर्ब्सच्या २०२४ च्या रिपोर्टनुसार पंकज पटेल यांची एकूण संपत्ती १०.६ अब्ज डॉलर्स होती. भारतीय चलनात ही रक्कम ८८ हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. २०२३ पर्यंत त्यांची संपत्ती ४.८ अब्ज डॉलर होती, परंतु २०२४ मध्ये त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली. झायडसच्या शेअर्समध्ये तेजी आल्यानंतर त्यांची नेटवर्थही झपाट्यानं वाढलं होतं.

Web Title: started doing pharmaceutical factory at the age of 8 now doing business in 70 countries success story Pankaj Patel zydus lifesciences who received the Padma Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.