Lokmat Money > बिझनेस न्यूज > ६ जानेवारीला येतोय या वर्षाचा पहिला IPO; प्राईज बँड ₹१४०, ग्रे मार्केटमध्ये आतापासूनच ₹८० प्रीमिअमवर

६ जानेवारीला येतोय या वर्षाचा पहिला IPO; प्राईज बँड ₹१४०, ग्रे मार्केटमध्ये आतापासूनच ₹८० प्रीमिअमवर

1st Mainboard IPO of 2025: आयपीओ मार्केटसाठी २०२४ हे वर्ष उत्तम ठरलं आहे. आता गुंतवणूकदारांना यंदाच्या आयपीओची प्रतीक्षा आहे. २०२५ मध्ये कंपनीचे अनेक दिग्गज कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 12:05 IST2025-01-02T12:05:35+5:302025-01-02T12:05:35+5:30

1st Mainboard IPO of 2025: आयपीओ मार्केटसाठी २०२४ हे वर्ष उत्तम ठरलं आहे. आता गुंतवणूकदारांना यंदाच्या आयपीओची प्रतीक्षा आहे. २०२५ मध्ये कंपनीचे अनेक दिग्गज कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत.

Standard Glass Lining IPO first ipo of year coming on January 6 Price band rs 140 already at a premium of rs 80 in the grey market | ६ जानेवारीला येतोय या वर्षाचा पहिला IPO; प्राईज बँड ₹१४०, ग्रे मार्केटमध्ये आतापासूनच ₹८० प्रीमिअमवर

६ जानेवारीला येतोय या वर्षाचा पहिला IPO; प्राईज बँड ₹१४०, ग्रे मार्केटमध्ये आतापासूनच ₹८० प्रीमिअमवर

1st Mainboard IPO of 2025: आयपीओ मार्केटसाठी २०२४ हे वर्ष उत्तम ठरलं आहे. आता गुंतवणूकदारांना यंदाच्या आयपीओची प्रतीक्षा आहे. २०२५ मध्ये कंपनीचे अनेक दिग्गज कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. दरम्यान, या वर्षीचा पहिला मेनबोर्ड आयपीओ पुढील आठवड्यात उघडेल. हा आयपीओ - स्टँडर्ड ग्लास लाइनिंग टेक्नॉलॉजी (Standard Glass Lining IPO) या कंपनीचा असेल. सोमवार, ६ जानेवारी २०२५ रोजी हा इश्यू गुंतवणुकीसाठी खुला होईल. गुंतवणूकदार यात बुधवार, ८ जानेवारी २०२५ पर्यंत बोलू लावू शकतात. याची किंमत १३३ ते १४० रुपये निश्चित करण्यात आली आहे.

GMP किती?

Investorgain.com दिलेल्या माहितीनुसार, स्टँडर्ड ग्लास लाइनिंग टेक्नॉलॉजीज आयपीओचा जीएमपी ८३ रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहे. म्हणजेच कंपनीच्या शेअर्सची संभाव्य लिस्टिंग प्राईज २२३ रुपये असेल. म्हणजेच लिस्टिंगवर जवळपास ६०% नफा होऊ शकतो. कंपनीचे शेअर्स १३ जानेवारी रोजी बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होऊ शकतात.

अधिक माहिती काय?

हैदराबादस्थित स्टँडर्ड ग्लास लाइनिंग टेक्नॉलॉजीजच्या ६०० कोटी रुपयांच्या आयपीओमध्ये २५० कोटी रुपयांपर्यंतचे शेअर्स नव्याने जारी करण्यात येणार आहेत. ऑफर फॉर सेलमध्ये १.८४ कोटी शेअर्सचा समावेश आहे. यातून एकूण ३५० कोटी रुपये उभे केले जातील. या कंपनीची स्थापना सप्टेंबर २०१२ मध्ये झाली.

कंपनी योजना काय?

आयपीओमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वापर कंपनी आपल्या भांडवली खर्चाच्या गरजा भागविण्यासाठी करणार आहे. त्याचबरोबर आपल्या उपकंपन्यांनी घेतलेल्या काही थकित कर्जाची परतफेड किंवा प्रीपेमेंटसाठी करणार आहे. याव्यतिरिक्त, पूर्ण मालकीच्या कंपन्यांमध्ये सामग्री सहाय्यक आणि अकार्बनिक विकासातील गुंतवणुकीसाठी वित्तपुरवठा करेल. उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट कामांसाठी वापरली जाणार आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Standard Glass Lining IPO first ipo of year coming on January 6 Price band rs 140 already at a premium of rs 80 in the grey market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.